विदर्भ की ताजा खबर

कोरोनाची लस सुरक्षितच:न घाबरता लस घ्या – गणेशजी राठोड उपजिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकारी गणेशजी राठोड यांच्यासह महसुल कर्मचारी यांना लसीकरण

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

कोरोनाची लस सुरक्षितच:न घाबरता लस घ्या – गणेशजी राठोड उपजिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी गणेशजी राठोड यांच्यासह महसुल कर्मचारी यांना लसीकरण

 

मेहकर तालुक्यामध्ये कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु असुन, शासकीय ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे गणेशजी राठोड उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मेहकर यांनी लस घेतली.यावेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी देण्यात आलेली लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असुन न घाबरता लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन केले.पुढे म्हणाले,लसीकरण केंद्रामधून लसीकरण सुरू आहे. लसीकरणापूर्वी येणाऱ्यांची नोंद घेऊन त्यांच्या अनुषंगीक तपासण्या करून लसीकरण केले जाते.लसीकरण झाल्यानंतरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना अर्धा ते एक तास ठेवले जाते.अशा प्रकारची अत्यंत चांगली सुविधा सर्व लसीकरण केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे.लसीकरण व्यवस्थितपणे सुरू आहे.यापूर्वीच आरोग्य क्षेत्रातील शासकीय व खाजगी अधिकारी,डॉक्टर्स,कर्मचारी यांचे लसीकरण सुरू झालेले आहे. आता आपण स्वत: व महसूल विभागातील सर्व विभाग प्रमुखांनी यांनीही लस घेतल्याचे सांगून उपजिल्हाधिकारी गणेशजी राठोड म्हणाले, कोणालाही याचा त्रास झालेला नाही या लसीच्या रिपोर्टनुसार ही प्रभावी लस आहे. यापुढे महसूल,पोलीस व इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे.आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये कोणत्याही व्यक्तीला लसीकरणाचा गंभीर दुष्परिणाम झालेला नाही. खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे,यावेळी शासकीय कर्मचारी यांनी कोरोनापासून सुरक्षिततेसाठी ही लस वेळेत आणि कोणतीही भिती न बाळगता घ्यावी,असे आवाहन केले

 

नीलेश नाहटा

19-02-2021

Related Articles

Back to top button
Close
Close