आर्वी / वर्धा जिला की ख़बर

एनसीसी छात्र सैनिकांनी केली संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

एनसीसी छात्र सैनिकांनी केली संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी

 

आर्वी 23-02-2021

स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिक कोरोना काळामुळे शाळा जरी बंद असल्या तरीसुद्धा सर्व कोरोना नियमांचे पालन करून एनसीसी छात्र सैनिकांनी एक वेगळा उपक्रम राबविला. संत गाडगे महाराज यांची जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश सर्व छात्र सैनिकांनी आपल्या गावांमध्ये,आपल्या परिसरामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये आपल्या ओपन स्पेस मध्ये स्वच्छता राबवून कुठेही एकत्र न जमता या जयंतीला संत गाडगे महाराजांचा विचार खरोखरच लोकांपर्यंत पोहोचला या उपक्रमांमध्ये सर्कसपूर मधून नेहा राऊत ,श्रद्धा सहारे, पलक मात्रे, हरदोलीु गावांमधून ऋतुजा जामखुटे, आर्वी मधून कश्यप गायकवाड,वेदांत श्रीराव ,वेदांत हुशंगे , प्रणय दूधकोर यांनी गुरुनानक परिसरामध्ये स्वच्छता केली तसेच जयंत कणके , ऋग्वेद निंभोरकर ,हर्षल निनावे, यांनी तायडे ले आऊट, साई नगर मध्ये मनस्वी कांबळे, शिरपूर रोड येथे पूर्वा सोलव, प्रणाली मनोहरे, तेजल डहाके या अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.त्यांनी आपल्या परिसरामधील लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला आणि खऱ्या अर्थाने गाडगे महाराजांचे विचार आज कोरोना काळामध्ये ही शिक्षण आणि स्वच्छता या दोनच गोष्टीवर आपलेआरोग्य निर्भर असते आणि त्यांची जयंती ही खऱ्या अर्थाने आपल्या अंगी स्वच्छता गुण ठेवून साजरी करण्याता आली. छात्र सैनिकांना या उपक्रमाचे मार्गदर्शन एन.सी.सी अधिकारी श्री प्रमोद नागरे यांनी केले.

आर्वी शहर प्रतिनिधि

Related Articles

Back to top button
Close
Close