कोविड लस घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांनी जागृती करावी —— गणेश राठोड उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी केली जानेफळ येथील कोविड सेंटरची पाहणी

कोविड लस घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांनी जागृती करावी —— गणेश राठोड उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी केली जानेफळ येथील कोविड सेंटरची पाहणी
निलेश नाहटा
मेहकर——–
जानेफळ ता. मेहकर येथील कोविड सेंटरची उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी २३ मार्च रोजी पाहणी केली यावेळी या सेंटरमध्ये लस घेण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांनी लस घेण्यासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी केले उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी २३ मार्च रोजी अचानक जानेफळ येथील सेंटरला भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली व रुग्ण व कोविड संदर्भात आढावा घेतला दरम्यान जानेफळ ही मोठी बाजार पेठ आहे या बाजारपेठेला जवळपास ३५ ते ४० खेड़े गाव जोडले आहेत जानेफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातून उपचार घेण्यासाठी रुग्ण या ठिकाणी येतात पण कोविड ची चाचणी व कोविड वैक्सीन घेण्यासाठी या ठिकानी गरजु लोक येत नसल्याचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड
यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या तर त्यानंतर गणेश राठोड
तलाठी कार्यालयाकड़े गेले त्या ठिकाणी जानेफळचे तलाठी विजेंद्र धोंडगे उपस्थित नसल्याचे दिसले व नेहमी करिता उपस्थित नसतात अशी माहिती सुद्धा त्यांना मिळाली
त्यानंतर जानेफळ येथील सरपंच व ग्रा प सदस्या सोबत चर्चा करुन जानेफळ
येथे कोरोना वैक्सीन जास्तीत जास्त घेण्यासाठी लोकाना
जागृत करून लस घेण्यासाठी जनतेला प्रवृत्त करण्याचे आवाहन यावेळी गणेश राठोड यांनी केले
सरपंच ग्रामसेवक व ग्रा प सदस्य तसेच महसूल प्रशासन कर्मचारी
व पत्रकार बांधव व इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या प्रतिनिधि नी सुद्धा करोंना वैक्सीन घेण्यासाठी प्रसिध्दि करावी सामाजिक कार्यकर्ता व राजकीय लोकांनी सुद्धा कोरोना वैक्सीन बाबत जनजागृति करावी