विदर्भ की ताजा खबर

सद्यस्थितीत कोरोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी मोठ्या प्रमाणावर असलेली प्लाझ्माची मागणी लक्षात घेता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील सर्वांत जुन्या व जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीला दोन प्लाझ्मा अफेरेसिस मशिन उपलब्ध करून दिल्या

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

सद्यस्थितीत कोरोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी मोठ्या प्रमाणावर असलेली प्लाझ्माची मागणी लक्षात घेता केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी विदर्भातील सर्वांत जुन्या व जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीला दोन प्लाझ्मा अफेरेसिस मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत.

सध्या रक्तपेढीकडे दररोज ७० ते ८० बॅग प्लाझ्माची मागणी होत असून एका मशिनद्वारे दिवसाला केवळ २० बॅगची प्रक्रिया होऊ शकत असल्याने उपलब्ध दोन प्लाझ्मा मशिन या मागणीसाठी अपुऱ्या पडत आहेत. अशा वेळी पुरवण्यात आलेल्या या अतिरिक्त दोन मशिनमुळे कोरोना रुग्णांसाठी सुरक्षित व तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केलेला प्लाझ्मा कमी वेळात व योग्य दरात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

नागपुर शहर प्रतिनिधि 06-05-2021

 

Related Articles

Back to top button
Close
Close