आर्वी / वर्धा जिला की ख़बर

आणि तब्बल तीन तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी वाचविले महिला रुग्णाचे प्राण…..या संचारबंदी काळात इतर आकस्मित रुग्ण सेवा झाल्या अत्यावश्यक ….. ( डॉक्टर राणे यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया )

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

*आणि तब्बल तीन तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी वाचविले महिला रुग्णाचे प्राण……*
*या संचारबंदी काळात इतर आकस्मित रुग्ण सेवा झाल्या अत्यावश्यक ……*
( डॉक्टर राणे यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया )

सध्या कोविड च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कोरोना उपचाराचा गाजावाजा सुरू आहे कोरोनासाठीच सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे आणि ते असायलाही पाहिजे ! मात्र अनेक रुग्णांना दुसरेही आजार असतात, अनेकदा रस्त्यावर किंवा घरीही अनेक अपघातही घडतात …हे सर्वश्रुत आहे

त्यामुळे त्यांच्यावरही तेवढ्याच तत्परतेने उपचार करणे अत्यावश्यक आहे अन्यथा त्यांचा जीव जाण्याची दाट शक्यता असते याची जाणीव ठेवून काच हातावर पडल्याने सर्व नसा तुटून अति प्रमाणात रक्तस्त्राव झाला अशा गंभीर परिस्थितीत आर्वीतील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रिपल राणे यांनी तीन तास आपले चमु सह शस्त्रक्रिया करून एका 34 वर्षीय महिलेचे प्राण वाचविले … या कोविड काळात ही.. ही ..सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे..
——
असं म्हणतात योग्य वेळी व योग्य पद्धतीने केलेले उपचार कठीण परिस्थितीत असलेल्या रुग्णासाठी जीवनदायी ठरू शकतात. याचा प्रत्यय नुकताच डॉ रिपल राणे यांनी एका महिला रुग्णांवर केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे दिसून आला.
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये हातखंडा असलेल्या डॉक्टर रिपल राणे यांनी आजवर अनेक रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करून रुग्णसेवेचा आदर्श घालून दिला आहे. अशाच प्रकारची एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टर राणे यांनी एका ३४वर्षीय महिला रुग्णाला प्राण संकटातून वाचवले. आपल्या घरीच काम करत असताना अपघाताने या महिलेच्या हातावर घरातीलच फर्निचरचा काच पडल्यामुळे तिच्या उजव्या हाताच्या मनगटावरील सर्वच्या सर्व नसा पूर्णपणे कापल्या गेल्या होत्या. त्यामुळे अति रक्तस्राव होऊन रुग्णाची स्थिती गंभीर झाली होती.
एकीकडे कोरोनाचे भीषण संकट,सर्वत्र लॉकडावून अशा विपरित परिस्थितीत या रुग्णाला गंभीर अवस्थेत राणे हॉस्पिटल ला आणण्यात आले. मनगटावरील सर्वच्या सर्व नसा कापल्या गेल्यामुळे रुग्णाच्या मनगटाची व बोटांची कुठलीच हालचाल होत नव्हती. तसेच रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात झालेला होता. रुग्णाची ही अवस्था पाहून डॉक्टर रिपल राणे यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
आणि आकस्मिक रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर असलेली आपली चमू सोबत घेऊन, सलग तीन तासाच्या अथक प्रयत्नाने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.आणि रुग्णाचे प्राण संकट टळले. या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या मनगटावरील कापल्या गेलेली प्रत्येक नस पुन्हा जोडण्यात आली, रक्तस्त्राव थांबविण्यात येऊन रुग्णाच्या प्रत्येक बोटांची व मनगटाची हालचाल पूर्ववत करण्यात आली ही बाब महत्वाची व विशेष उल्लेखनीय आहे.
आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे सर्वत्र कोरोना रुग्णाच्या उपचाराला प्राधान्य देण्यात येत आहे आणि ते बरोबरही आहे. परंतु कधिकधी अशा गंभीर परिस्थितीत आलेल्या नॉन कोविड रूग्णांना देखील वेळेत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या डॉक्टरांच्या सेवेची नितांत आवश्यकता आहे, हेच या प्रसंगावरून सिद्ध होते. जर या रुग्णाला डॉक्टर राणेंकडून तातडीने व योग्य उपचार मिळाले नसते तर अति रक्तस्त्रावामुळे या महिलेला प्रसंगी जीव सुद्धा गमवावा लागला असता . त्यामुळेच राणे हॉस्पिटल द्वारे अशा सर्वच नॉन कोविड रुग्णांनसाठी सातत्याने सुरू असलेली आकस्मिक रुग्णसेवाही तितकीच महत्त्वाची व आवश्यक आहे.

आर्वी प्रतिनिधि 09-05-2021

Related Articles

Back to top button
Close
Close