आर्वी / वर्धा जिला की ख़बर

वाढत्या_लॉकडाऊन_मुळे_बाळा_जगताप_संतप्त तहसील_कार्यालयात_लावला_फळांचा_ढीग

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

वाढत्या_लॉकडाऊन_मुळे_बाळा_जगताप_संतप्त

तहसील_कार्यालयात_लावला_फळांचा_ढीग

वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कोणतेही नियोजन न करता वारंवार लावण्यात येणाऱ्या कडक लॉक डाऊन च्या विरोधात आज पुन्हा लॉक डाऊन पुन्हा वाढवल्यामुळे प्रहारचे बाळा जगताप संतप्त झालेले पाहायला मिळाले त्यांनी लॉक डाऊन मुळे खराब झालेले सर्व फळे तहसील कार्यालयात आणून त्याचा ढीग लावला. शेतकरी कष्टकरी लहान व्यापारी यांचा या असल्या लॉक डाऊन मुळे कसे नुकसान होत आहे ते निदर्शनात आणून दिले.
वर्धा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात सख्तीचा लॉक डाऊन लावून सर्व लहान मोठे व्यवसाय बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फळे , भाजीपाला शेतातच सडून खराब होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यात आज पुन्हा जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन वाढविला त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनेचा बांध अखेर फुटला व बाळा जगताप यांनी खराब फळे तहसीलदार यांच्या कार्यालयात आणून त्याचा ढीग लावला.. त्यामुळे निद्रिस्त प्रशासन जागरूक झाले. व बैठकीचे आयोजन केले त्यात उपविभागीय अधिकारी , तहसीलदार व शेतकऱ्यांच्या वतीने बाळा जगताप अशी बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांना नोंदणी करून दररोज सकाळी 11 वाजेपर्यंत आपला माल विकण्याकरिता परवानगी देण्यात आली. त्यामुळे थोडा का होईना दिलासा मिळाला.
यावेळी सर्व शेतकरी बळीराजा, फळ विक्रेते, फळ उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी यांनी बाळा जगताप यांचे आभार व्यक्त केले.

आर्वी प्रतिनिधि 12-05-2021

Related Articles

Back to top button
Close
Close