आर्वी / वर्धा जिला की ख़बर

कोविशिल्ड_लसीचा_दुसऱ्या_डोसच्या_कलावधीत_बदल *केंद्र शासनाने लागू केल्या नवीन मार्गदर्शक सूचना

photostudio_1606581649738
photostudio_1601020483281 (1)
advertising-word-block
VIGYAPAN
IMG-20210302-WA0056
IMG_20210303_184058_612

कोविशिल्ड_लसीचा_दुसऱ्या_डोसच्या_कलावधीत_बदल
*केंद्र शासनाने लागू केल्या नवीन मार्गदर्शक सूचना*

#कोविशील्ड_लस पहिला व दुसरा डोस उद्यापासून सुरू*

वर्धा, दि १४ (जिमाका):- राज्यामध्ये कोविड लसीकरणाचा कार्यक्रम दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून सुरु झाला आहे व टप्प्या टप्प्याने वेगवेगळया वयोगटाचे लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. पूर्वी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी ६ ते ८ आठवड्यांचा होता. केंद्र शासनाच्या १३ मे रोजीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार आता दुसरा डोस घेण्याचा कालावधी १२ ते १६ आठवडयाचा राहणार आहे.

आतापर्यन्त दिलेल्या लसीकरणाच्या डोसेस मध्ये कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोस मध्ये ४ आठवडयाचे अंतर व कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसेस मध्ये ६ – ८ आठवडयाचे अंतर ठेवण्यात येत होते. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आता कोव्हिशील्ड लसीच्या २ डोसेस मधील अंतर १२ ते १६ आठवडे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोव्हीशील्ड लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस १२ ते १६ आठवडयाच्या अंतराने दिला जाणार आहे.
कोव्हॅक्सिन लसीच्या या पूर्वीच्या सुचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही.
त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस पूर्वी प्रमाणोच ४ आठवडयाने देण्यात येणार आहे.

कोवीशील्ड लसीचा उपलब्ध साठा ज्या हेल्थ वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचा दुसरा डोस देय आहे त्यांना प्राधान्याने दयावा व उर्वरित साठा ४५ वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांच्या पहिला डोससाठी वापरण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

*कोविशील्डचा पहिला डोस उद्यापासून सुरू*

कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही लसीचा साठा संपल्यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहीम थंडावली होती. १८ ते ४४ वयोगटासाठी प्राप्त झालेली कोव्हॅक्सिन सुद्धा कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देय असलेल्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र केंद्र शासनाकडून कोविशील्ड लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्यात कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या १५मे पासून सुरू करण्यात येणार आहे.

*चौकट*
*ही केंद्रे सोडून सर्व ठिकाणी राहणार सुरू*
कोव्हॅक्सिन लसीसाठी सुरू असलेले जिल्ह्यातील पोलीस रुग्णालय, सामान्य रुग्णालय, गांधी मेमोरियल रुग्णालय, आणि रेल्वे रुग्णालय सोडून इतर सर्व केंद्रवार कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी ९.३० ते ५ या वेळेत उपलब्ध असणार आहे.

*चौकट*
*ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी*
कोविशील्ड लसचा पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू असणार आहे. ऑनलाईन ३० टक्के तर ऑफलाईन ७० टक्के नोंदणी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नाईक यांनी केले आहे.

*चौकट*
*जिल्ह्यात कोविशील्डचे 12 हजार डोस प्राप्त*
जिल्ह्यात कोविशील्ड लसीचे १२ हजार डोस काल प्राप्त झाले असून 4 केंद्र सोडून सर्व केंद्रावर पहिल्या व दुसऱ्या डोस साठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दी न करता लस घ्यावी.
*डॉ प्रभाकर नाईक*
*प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी*

Related Articles

Back to top button
Close
Close