अपराधआर्वी / वर्धा जिला की ख़बरकिसान/अन्नदाताखेलताजा ख़बरेंदेशधर्मप्रतियोगिता ओर Contestमनोरंजनराजनीतिराज्यविदर्भ की ताजा खबरविश्वव्यापारशिक्षास्वास्थ्य

प्रहार चे आंदोलनसम्राट बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
photostudio_1627621229111
photostudio_1627808634241
IMG-20210801-WA0159
photostudio_1630559959758

आर्वी त प्रहार चे लक्षवेधी आंदोलन

आर्वी :- (ता.१२) आज प्रहार चे आंदोलनसम्राट बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
शासनाने आर्वी ते कौडण्यपुर , आर्वी ते वर्धा , आर्वी ते तळेगाव या मार्गांचे बांधकाम सुरू केले होते. या कामाचे भूमिपूजन विभागाचे आजी माजी आमदार तसेच वर्धा जिल्हाचे पालकमंत्री यांनी सुद्धा केले. या मार्गांनी प्रवास करणाऱ्यांना आनंद झाला मात्र कोठे माशी शिंकली काय माहित.. भूमिपूजन होताच संबंधित कंत्राटदार बांधकामाचे सर्व साहित्य व यंत्रणा घेऊन पसार झाला. का गेला यामागचे कारण काही अद्याप कळले नाही. आर्वी कौडण्यपूर या मार्गावर संत लहानुजी महाराज यांचे देवस्थान आहे. विदर्भ कन्या रुख्मिणी यांचे कौडण्यपूर हे माहेर असून, अमरावती सारख्या मोठ्या बाजारपेठेला जोडणारा हा मार्ग आहे. त्याच प्रमाणे आष्टी तालुक्याला जोडणारा आर्वी तळेगाव मार्ग तसेच जिल्हाच ठिकाण वर्धाला जोडणारा आर्वी वर्धा मार्ग अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असल्याकारणाने या रस्त्यांची डागडुजी सुद्धा झालेली नाही.. परिणामतः रस्त्यावर तीन तीन फुटांचे खड्डे पडलेले आहे. चालकांना जीव मुठीत घेऊन घड्डे चुकवत चुकवत रस्त्यावरून वाट काढावी लागत आहे. आठवड्यातून दोन चार अपघात हे आता नित्याचीच बाब झालेली आहे. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन झाले मात्र निगरगट्ट प्रशासन जागे व्हायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे आज प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात दुचाकीला खांद्यावर उचलून नेत आर्वी येथील तहसीलदार श्री चव्हाण यांना दुचाकी भेट देऊन तहसील कार्यालयात ठिय्या देण्यात आला.. लवकरात लवकर सदर रस्त्यांचे काम मार्गी न लागल्यास प्रहार यापेक्षाही तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल असा स्पष्ट इशारा बाळा जगताप यांनी प्रशासनाला दिला…

Related Articles

Back to top button
Close
Close