मोफत लसीकरण केंद्रासाठी लायन्स क्लबचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन* *राणे हॉस्पिटल मधील सरकारमान्य कोरोना लसीकरणकेंद्रा मार्फत नागरिकांना मोफत लसीकरण करण्याची तयारी…लायन्स क्लब आर्वी

*मोफत लसीकरण केंद्रासाठी लायन्स क्लबचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*
*राणे हॉस्पिटल मधील सरकारमान्य कोरोना लसीकरणकेंद्रा मार्फत नागरिकांना मोफत लसीकरण करण्याची तयारी…लायन्स क्लब आर्वी*
आर्वी – कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आपल्या स्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणासाठी लसीच्या उपलब्धतेनुसार वयोगटाचे वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहे ,सध्या 18 वर्षे व त्यापुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते.
आर्वी येथे उपजिल्हा रुग्णालय या एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र असून या ठिकाणी नागरिकांची लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीमुळे लसीकरण यंत्रणेवर ताण येत असून नागरिकांना ही चार चार तास ताटकळत बसावे लागत आहे . अशा आशयाची बातमी देखील नुकतीच वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे.
वाढत्या गर्दीमुळे उपजिल्हा रुग्णालय वर येणारा ताण कमी व्हावा तसेच गर्दीमुळे पुन्हा होणारा संक्रमणाचा धोका टाळता यावा यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या *आर्वी लायन्स क्लबने* आपले सामाजिक दायीत्व म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी आर्वी यांना नुकतेच एक निवेदन दिले असून त्यामध्ये लायन्स क्लब आर्वी द्वारे शहरातील मध्यवर्ती भागात असलेले व आरोग्य सोयींनी परिपूर्ण असलेल्या *राणे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या* सरकारमान्य कोरोना लसीकरण केंद्राच्या माध्यमातून शासनाप्रमाणेच मोफत लसीकरण करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याकरिता राणे हॉस्पिटलच्या संचालकांनी देखील आपल्या रुग्णालयातील अनुभवी व प्रशिक्षित आरोग्य सेवकही यासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. यापूर्वी स्वतः डॉक्टर रिपल राणे यांनी सुद्धा शासनाने मोफत लस उपलब्ध करून दिल्यास राणे हॉस्पिटल कडून विनामूल्य लसीकरण करण्यात येईल या साठी प्रशासनाने परवानगी द्यावी याकरिता माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून पत्र दिले होते, हे विशेष.
उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दी मुळे तेथील आरोग्य सेवेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच कोरोना संक्रमणाचा धोका, येणारा ताण टाळण्यासाठी आर्वी लायन्स क्लबने पुढाकार घेतला असून निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास गर्दीचे नियोजन होईल, नागरिकांचा त्रास वाचेल व आरोग्य यंत्रणेवरील अतिरिक्त ताणही कमी होईल. त्यामुळे प्रशासनाने लायन्स क्लबच्या प्रस्तावाला मान्यता देऊन मोफत लस उपलब्ध करून दिल्यास *राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* येथे उपजिल्हा रुग्णालया प्रमाणेच विनामूल्य लसीकरण करता येऊन; एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांना विशेषत: जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.