आर्वी / वर्धा जिला की ख़बर

आर्वी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी विशाल साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. हा कार्यक्रम आर्वी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेस नेते अमर काळे यांच्या निवासस्थानी पार पडला.अमरभाऊ काळे व वर्धा जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष विपीन राऊत यांच्या हस्ते विशाल साबळे यांना नयुक्ति पत्र प्रदान करण्यात आले

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
IMG-20210623-WA0059

आर्वी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदी विशाल साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. हा कार्यक्रम आर्वी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेस नेते अमर काळे यांच्या निवासस्थानी पार पडला.अमरभाऊ काळे व वर्धा जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष विपीन राऊत यांच्या हस्ते विशाल साबळे यांना नयुक्ति पत्र प्रदान करण्यात आले.उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत असतांना अमर काळे यांनी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जनतेच्या सेवेत तात्पर व नेहमी उपलब्ध राहण्याच्या सूचना दिल्या व संपूर्ण टीम ला त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अमरभाऊ काळे यांनी सांगितले.जनतेचे प्रश्न त्यांच्या पर्यंत पोहोचवावे असे देखील ते म्हणाले.युवकांचे प्रश्न ठाम पने मांडावे व पक्ष बळकट करण्याकरिता अनेक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे जिल्हाध्यक्ष विपीन राऊत ह्यानी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितले. अमरभाऊ काळे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विशाल साबळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.पुढील काळात तालुक्यातील सर्व सामान्य युवकांचा आवाज बनवून संघटन मजबूत करण्याची प्रमुख जबाबदारी विशाल साबळे यांच्यावर असेल. ह्या नयुक्तीच्या माध्यमातून आर्वी तालुक्यात युवक काँग्रेस आणखी मजबुत होईल.ह्यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वाघमारे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गौरव मोहोड,प्रतीक मुडे,सागर शिरपूरकर, वजाहात खान ,निलेश देउळकर,तुषार साबळे,देवेंद्र तळेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

आर्वी शहर प्रतिनिधि 11-07-2021

Related Articles

Back to top button
Close
Close