राज्य

राज्यात पर्यटन विकासासाठी २५० कोटींचा निधी वितरीत करण्याचे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निर्देश

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
IMG-20210623-WA0059

राज्यात पर्यटन विकासासाठी २५० कोटींचा निधी वितरीत करण्याचे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निर्देश

राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पर्यटन विकासासाठी प्रायोगिक तत्वावर दहा ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’

पर्यटन विकासातील खासगी संस्थांच्या सहभागासाठी जिल्ह्यात पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय

राज्यातील पर्यटन विकासाच्या प्रकल्पांचा आढावा आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत करण्याचे निर्देश या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास तसेच पर्यटन विकासात खासगी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पर्यटन विकासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पीय तरतूदीच्या २५ टक्के निधी टप्प्याटप्याने वितरीत करण्याबरोबरच पूर्णत्वास गेलेल्या पर्यटन विकासकामांची ७२ कोटींची देयके अदा करण्यात यावीत, जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची प्रायोगिक तत्वावर आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना ॲग्रो टुरिझमच्या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांचा विचार व्हावा, असेही बैठकीत ठरविण्यात आले.

Source 18-07-2021

Related Articles

Back to top button
Close
Close