आर्वी शहरातील संजय नगर येथील अनेक युवकांनी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व मतदारसंघातील त्यांच्या विकास कार्या ने प्रभावी होऊन दि.२६ जुलै रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आर्वी शहरातील संजय नगर येथील अनेक युवकांनी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व मतदारसंघातील त्यांच्या विकास कार्या ने प्रभावी होऊन दि.२६ जुलै रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश सोहळा अमर काळे यांच्या निवासस्थानी पार पडला.ह्याप्रसंगी अमरभाऊ काळे यांनी सर्वांशी विविध विषयांवर चर्चा सुद्धा केली.प्रवेश करणाऱ्यांमध्ये विक्रम धुर्वे,सुरज पाटील,शहंशाह राऊत,सूर्या पवार,आकाश मेंद्रे,भावेश तायवाडे,राहुल ढोरे,नितीन मसराम,श्रीकांत सयाम, अनिकेत लिल्हारे,अरबाज शाह,मयूर गजभिये, सलमान शाह,किशन हटकर,सोयीब शाह,कलिम शाह यांचा समावेश आहे.ह्यावेळी आर्वी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल साबळे,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वाघमारे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे,दीपक मोटवणी,रामू राठी,गणेश नखाते,शेख मुझफ्फर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
आर्वी शहर प्रतिनिधि