कोरोनामुळे छत्र हरवलेल्या मुलांना केली लायन्स क्लब आर्वी ने मदत* *कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची व शैक्षणिक साहित्याची स्वीकारली जवाबदारी

*कोरोनामुळे छत्र हरवलेल्या मुलांना केली लायन्स क्लब आर्वी ने मदत*
*कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची व शैक्षणिक साहित्याची स्वीकारली जवाबदारी*
आज संपूर्ण जगात तसेच राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे कित्येक मुलांनि आपले आई किंवा वडील गमावले आहे ,आज घरातील कमावती व्यक्ती गमावल्या मुळे बऱ्याच परिवाराची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब आर्वी यांनी ज्या मुलांनी आपले पालक कोरोना मुळे गमावले आहे अशा आर्वी व परिसरातील गावांमधील अनाथ विद्यार्थ्यांना शाळेत लागणारे वर्षभराचे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले तसेच या सर्व मुलांची शिक्षणाची जबाबदारी सुद्धा लायन्स क्लब आर्वीच्या वतीने घेण्यात आली . कोरोना मुळे अनाथ झालेल्या मुलांची शिक्षणाची सोय व वर्षभराचे शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम लायन्स क्लब आर्वी द्वारा निरंतर सुरू राहणार आहे असे प्रतिपादन लायन्स क्लब आर्वी चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रिपल राणे यांनी या वेळी केले .
पालकांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हिमांशू अतुल गुल्हाने ,देवांशू अतुल गुल्हाने आर्वी ,तसेच मांडला येथील स्वराज गजानन निंबेकर, सर्वांगी गजानन निंबेकर, खूपगाव येथील सुहान राहुल भगत आणि सोहम राहुल भगत, नांदुरा पुनर्वसन येथून रुचिका विजय ऊईके, कुमारी पलक विजय ऊईके, प्राची किशोर सेलोकर,राम सुधीर गोडसे अशा सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी प्रांतपाल ला विनोदजी वर्मा माजी प्रांतपाल ला प्रतिभाताई अदलकिया, लायन्स क्लब आर्वी चे संथापक अध्यक्ष डॉ रिपल राणे ,रिजन चेयरपर्सन डॉ सौ कालिंदी राणे , लायन्स क्लब आर्वी चे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन वानखेडे , सचिव लाॅ सुनीता जाणे ,कोषाध्यक्ष प्रमोद नागरे आणि इतर सर्व लायन्स क्लब आर्वीचे सदस्य उपस्थित होते.