आर्वी / वर्धा जिला की ख़बर

क्रांतीदिन व विश्व आदिवासी दिनी 52 तरुणांचे हुतात्म्यांना श्रद्धांजलि अर्पण करून केले रक्तदान

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

क्रांतीदिन व विश्व आदिवासी दिनी 52 तरुणांचे हुतात्म्यांना श्रद्धांजलि अर्पण करून केले रक्तदान* 🩸

आर्वी: संभाजी ब्रिगेड  व बिरसा मुंडा युवा क्रांति संघ यांनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे आयनॉक्स हॉल येथे आयोजन केले. आदिवासी समाज भवन येथे अभिवादन व वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला डॉ. रिपल राणे, प्रफुलदादा क्षीरसागर (जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), मा.अशोक धुर्वे (एम्प्लॉईज फेडरेशन), अ‍ॅड. सुरेंद्रजी जाने, प्रकाशराव बर्डे, अर्चनाताई चाफले (अध्यक्ष महिलाआघाडी संभाजी ब्रिगेड), संजयराव कुसराम (कुवारा भीवसन बाबा सेवा समिती) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन रोहन हिवाळे (तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड) यांनी केले. तसच डॉ. रवी भांगे (Rainbow 🌈 Blood Bank, Nagpur) व डॉ रिपल राणे यांनी रक्तदानाचे फायदे व त्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी रक्तदात्यांना ट्रॅवलिंग बॅग, प्रमाणपत्र, केळी बिस्किटे यांचे वितरण करण्यात आले. एम्प्लॉईज फेडरेशन कडून नाश्ता वितरण सुद्धा झाले. Axis Bank चे assistant Officers यांच्यासह 52 तरुणांनी रक्तदान 🩸केले.
Rainbow 🌈 Blood Bank, Ramdas Peth, Nagpur यांनी रक्त संकलित केले व आयोजकांना प्रमाणपत्र देण्यात आले. संभाजी ब्रिगेड चे गणेश पंधराम, शुभम राजे, चेतन आत्राम (शहर अध्यक्ष आदिवासी विकास परिषद) यांनी सहकार्य करून सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
Close
Close