आपल्याकडे फाशीची शिक्षा हि अगदी दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे “रेअरेस्ट ऑफ द रेअर” गुन्हा केल्यास देण्यात येते. कोर्टात अशी पद्धत आहे कि फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायमूर्ती महोदय ज्या पेनाने फाशीच्या शिक्षेबद्दल न्यायालयीन कागदपत्रांवर लिहिले जाते त्या पेनाची निब आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर लगेच तोडून टाकतात. मृत्यदंड देताना जज साहेब पेनाची निब मोडतात, वाचा यामागचं रहस्य!

आपल्याकडे फाशीची शिक्षा हि अगदी दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे “रेअरेस्ट ऑफ द रेअर” गुन्हा केल्यास देण्यात येते.
कोर्टात अशी पद्धत आहे कि फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायमूर्ती महोदय ज्या पेनाने फाशीच्या शिक्षेबद्दल न्यायालयीन कागदपत्रांवर लिहिले जाते त्या पेनाची निब आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर लगेच तोडून टाकतात.
मृत्युदंड हा कायदा किंवा नियम नाही तर नियमांना एक अपवाद आहे.
म्हणजेच जेव्हा सर्व नियम व कायदे मोडल्याची परिस्थिती निर्माण होते तसेच जेव्हा दुसरा कुठलाच उपाय किंवा मार्ग उरत नाही तेव्हाच अपवादात्मक केसेसमध्ये व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा मिळते.
इतकी टोकाची शिक्षा सुनवावी लागल्यामुळे जजसाहेब भावनावश झाले असतील आणि भावनेच्या भरात त्यांच्या हातून पेनाची निब तुटली असेल असा तर्क काही लोक ह्याबाबतीत करतात.
खरे तर असे कुठल्याही पुस्तकात लिहिलेले नाही. ह्या पद्धतीबाबत अनेक ठिकाणी फक्त विविध थियरीज दिल्या आहेत.
ह्यातले काय सत्य आणि काय काल्पनिक आपण सांगू शकत नाही कारण हा कायदा नाही तर काळाच्या ओघात एक प्रथा तयार झाली आहे. आजही कुठले न्यायाधीश जर फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर निब तोडत नसतील तर ते कायद्याचे उल्लंघन ठरणार नाही.
एखाद्या केसचा निकाल लागल्यानंतर ,शिक्षा सुनावल्यानंतर कोर्ट functus officio होते म्हणजेच कोर्टाचे अधिकार समाप्त होतात. त्यानंतर कोर्ट एखाद्याची शिक्षा कमी किंवा वाढवू शकत नाही.
एकदा फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर जजसाहेबांना त्यात बदल करण्याचे अधिकार उरत नाहीत.
ह्यामागे अशी एक श्रद्धा सुद्धा आहे कि ज्या पेनाने एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याचा आदेश देण्यात आला आहे, त्या पेनाचा उपयोग दुसऱ्या कुठल्याही कामासाठी केला जाऊ नये.
म्हणजेच ज्या लेखणीने एखाया व्यक्तीला मृत्यू दिला आहे, ती लेखणी नष्ट करून टाकणेच योग्य आहे जेणे करून ती लेखणी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये.
ह्याबाबतीत आणखी एक थिअरी अशी सांगतात की ज्या पेनाने जजसाहेबांनी मृत्युदंडाची शिक्षा लिहिली, तो पेन सतत त्यांना आपल्या निर्णयाची आठवण करून देत राहील.
म्हणूनच तो पेन त्या क्षणीच नष्ट करून टाकणे योग्य आहे. माणूस कितीही नीच असला तरीही त्याचा मृत्यू आपल्या आदेशानुसार होणे ह्याचे दु:ख जजसाहेब निब तोडण्याद्वारे व्यक्त करतात.
Source 11-09-2021