राज्य

माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले.

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले.

बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश:

• गुन्ह्यात रिक्षांचा वापर होत असल्याने रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालून नोंदणी करताना, स्थानिक पोलिसांकडे माहिती देणे परवानाधारकाला बंधनकारक करा.

• इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.

• जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.

• शक्ती कायद्यातही सुधारणा करण्यावर भर दिला जाईल

• महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.

Source 14-09-2021

Related Articles

Back to top button
Close
Close