विदर्भ की ताजा खबर

विहिरीत उतरून पकडला 10 फुट लांबीचा….अजगर साप  “महिला सर्पमित्र वनिता ताई बोराडे यांनी

VIGYAPAN
photostudio_1627808634241
IMG-20210925-WA0091
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627

“विहिरीत उतरून पकडला 10 फुट लांबीचा….अजगर साप  “महिला सर्पमित्र वनिता ताई बोराडे यांनी

मौजे. वरवंड ता. मेहकर जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी श्री. उत्तम पायघन यांचे शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी त्यांचे शेताचे शेजारी असणारे अंकुश खरात, ओंकार वाडेकर गेले असता त्यांना या विहिरीतील पाण्यात भलामोठ्ठा अजगर साप तरंगत असल्याचे दिसले. सापाला पाहाताच दोघे ही खुप घाबरून गेले. त्यांनी मोबाईल द्वारे सर्पमित्र वनिता बोराडे यांना संपर्क करून माहीती दिली. शेतमालक उत्तम पायघन यांनाही कळवीले सर्वत्र वार्ता पोहोचली व गावकर्‍यांची गर्दी शेतात अजगर पाहण्यासाठी जमा होऊ लागली मेहकर हिवरा आश्रम येथून सर्पमित्र वनिता बोराडे शेतात दाखल झाल्या दरम्यान वरवंड गावचे कर्तव्यदक्ष संवेदनशील पत्रकार समाजसेवक असणारे निलेश नाहटा हे ही सुद्धा घटनास्थळी पोहचले. त्यांची ही शेती याच शेत शिवारात आहे. सर्व शेतकरी बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करीत सर्पमित्र वनिता बोराडे विहिरीत उतरल्या व त्यांनी अतिशय धाडसाने कोणत्याही उपकरणांची मदत न घेता सरळ आपल्या हाताने या भल्यामोठ्या 10 फूट लांबीच्या साधारणत: 15 किलो वजनाच्या अजगराला आपल्या हाताने हळुवारपणे पकडले विहीर 55 फूट खोल आहे, पाणी 45 फुटापर्यंत तुडुंब भरले आहे. विहिरीत एका कंगणीचा सहारा घेऊन शुरतेजस्वीनी धाडसी सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आपल्या अलौकिक कौशल्याचा वापर करीत काही क्षणातच या अजगराला पकडून एका थैली मधे बंद केले. वनविभागामार्फत याला पशु वैद्यकीय तपासणी करून सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्र वनिता बोराडे यांनी उपस्थितांना सांगितले. सर्वांनी हा अजगर पकडण्याचा थरारक अनुभव घेतला व वनिताताईचे आभार मानले व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला असून सर्व शेतकरी बंधवाने सोयाबीन सोंगनी चे वेळी सापा पासून सतर्क राहन्याचे आव्हान केले.

नीलेश नाहटा.मेहकर

Source 19-09-2021

Related Articles

Back to top button
Close
Close