आर्वी / वर्धा जिला की ख़बर

गांधी विद्यालय मध्ये राष्ट्रीय छात्र सैनिकांची निवड प्रक्रिया संपन्न

VIGYAPAN
photostudio_1627808634241
IMG-20210925-WA0091
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627

*गांधी विद्यालय मध्ये राष्ट्रीय छात्र सैनिकांची निवड प्रक्रिया संपन्न*

आर्वी:- स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयात मधील एनसीसी युनिटमधील 2020 21 यामध्ये दिनांक 20 सप्टेंबर सकाळी अकरा वाजता पासून निवड चाचणीत सुरुवात झाली. ही चाचणी घेण्याकरता ट्वेंटीवन महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्ध्यातील हवालदार प्रमोद वर्मा आणि हवालदार राम कापसे तसेच एन सी सी अधिकारी प्रमोद नागरे उपस्थित होते. या निवड प्रक्रियेमध्ये वर्ग आठवी मधील जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांमधून 50 विद्यार्थ्यांची निवड ही एनसीसी प्रमाणपत्र परीक्षा करीता झाली यात विद्यार्थ्यांना शारीरिक तसेच लेखी परीक्षेच्या आधारे आणि वैद्यकीय चाचणी या पात्रतेच्या आधारे त्यांची निवड करण्यात येते हे सर्व विद्यार्थी दोन वर्ष करीता डीजी एन सी सी दिल्ली यांच्याद्वारे विविध प्रशिक्षणाकरिता पात्र होतात. आणि नवव्या वर्गामध्ये जवळपास पाचशे गुणांची अंतिम परीक्षा घेऊन त्यांना अ श्रेणी प्रमाणपत्र देण्यात येतात. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना भविष्यातील विविध संधी उपलब्ध होतात एनसीसी असलेले तालुक्यातील एकमेव विद्यालय नगरपरिषद गांधी विद्यालय आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची आवड या क्षेत्राकडे असून आपण देशाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्याकरता विद्यार्थी एनसीसी जॉईन करत असतात.

Related Articles

Back to top button
Close
Close