आर्वी / वर्धा जिला की ख़बर

प्रधानमंत्री आवास योजना 2022 अंतर्गत सर्वांसाठी घरे उपक्रम जिल्ह्यातील 52 हजार 239 लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ तक्रारींच्या निराकरणासाठी ‘26 सप्टेंबर’ या एकाच दिवशी सर्व ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन

VIGYAPAN
photostudio_1627808634241
IMG-20210925-WA0091
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627

प्र.प.क्र – 655 दि. 20.9.2021
प्रधानमंत्री आवास योजना 2022 अंतर्गत सर्वांसाठी घरे उपक्रम
जिल्ह्यातील 52 हजार 239 लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ
तक्रारींच्या निराकरणासाठी ‘26 सप्टेंबर’ या एकाच दिवशी सर्व ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन
घरकुलच्या लाभासाठी ‘आवास प्लॅस’ सॉफ्टवेअर विकसित

वर्धा, दि. 20 : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रम अंतर्गत जिल्ह्यातील गरजू पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. या उक्रमांतर्गत शासनाच्यवतीने ‘आवास प्लस’ साफ्‌टवेअर विकसित करण्यात आले असून या माध्यमातून सर्वेक्षण करुन पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 52 हजार 239 लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळवून दिला जाणार आहे, अशी माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
या उपकमांतर्गत प्रामुख्याने प्रपत्र-ड मधील माहितीच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची प्राधान्य क्रम यादी तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमध्ये आवास प्लस सर्वेक्षणाची माहिती वापरुन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करीता लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्याचे काम लवकरात लवकर सुरु करुन याद्या तयार करण्याबाबत संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी व योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत. या कामास प्रथम प्राधान्य द्यावे, जेणेकरुन एकही गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशा सूचनाही श्री. ओम्बासे यांनी दिल्या आहे.
तालुकानिहाय प्रपत्र-ड मधील लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे-
आर्वी तालुक्यात 6 हजार 117, आष्टी तालुक्यात 5 हजार 875, देवळी त 8 हजार 892,हिंगणघाट 8 हजार 892, कारंजा 5 हजार 546, समुद्रपूर 5 हजार 46, सेलू 5 हजार 194, वर्धा 6 हजार 726 असे एकूण 52 हजार 239 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
या अनुषंगाने दि.18 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गाच्या अनुषंगाने निर्देश देण्यात आले आहे की, वर्धा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या यापूर्वीच्या ब यादी मध्ये बरेच आक्षेप प्राप्त झाल्याने योजना राबवितांना अनेक अडचणी सोडवाव्या लागल्यात. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायत स्तरावर 26 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे सूचीत करण्यात आले आहे. भविष्यात कोणताही आक्षेप किंवा तक्रारी उद्भणार नाही यासाठी सर्वांनी या विशेष ग्रामसभेत सहभागी होण्याचे आवाहन जि. प. प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.
नागरिकांनी या विशेष ग्रामसभेत सर्वासमक्ष अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळावी. ग्रामसभेने ठरविल्यानंतर पात्र/ अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्यानंतर प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये फ्लेक्स बोर्ड, नोटीस बोर्ड तसेच इलेक्ट्रानिक मीडिया व सोशल मीडिया, व्हॉटस ॲप, दवंडी आदींच्या माध्यमातून प्रचार प्रसिध्दी करावी.
तयार होणाऱ्या यादीवर कुणाला काही आक्षेप असल्यास यादी प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करावी, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले आहे.

 

Related Articles

Back to top button
Close
Close