विदर्भ की ताजा खबर

केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथे असलेल्या मोती नाला जलसंवर्धन प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली.

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथे असलेल्या मोती नाला जलसंवर्धन प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली.

तामसवाडा पॅटर्नवर आधारित मोती नाला जलसंवर्धन प्रकल्प गडकरीजी यांच्या प्रयत्नातून ‘प्रकल्प सद्भावना ग्रामीण विकास संस्था’ यांनी पूर्ती सिंचन समृद्धी संस्था व वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टप्प्यांत पूर्ण केला.

या प्रकल्पामुळे मोतीनाल्याच्या पात्रात प्रतिवर्ष २८० सहस्र घनमीटर एवढा भूपृष्ठीय जलसाठा होत असून या भूजल पुनर्भरणातून प्राप्त ६० कोटी लिटर पाण्याचा उपयोग परिसरातील शेती व सिंचनासाठी बहुमोल ठरत आहे.

याशिवाय नाल्याच्या कामाव्यतिरिक्त शेतींतर्गत क्षेत्र, उत्पादन, पशुपालन, रोजगार, हरित क्षेत्र यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रकल्पाचे फलित म्हणजे परिसरातील नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांना दुष्काळमुक्ती व पूरमुक्तीचा अनुभव येत असून त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे.

Related Articles

Back to top button
Close
Close