आर्वी / वर्धा जिला की ख़बर

माजी आमदार श्री अमरभाऊ काळे यांनी श्री.हनुमान मंदिर देवस्थान हैबतपुर (वाठोडा) तीर्थक्षेत्र ला ‘क’ दर्जा मिळावा त्याकरिता वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुनिल जी केदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने दि.२२ ऑक्टोबर,२०२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला

VIGYAPAN
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG-20221004-WA0332
IMG_20220927_150515_046
IMG-20221019-WA0027
IMG_20221016_174312_421
IMG_20221015_134301_759
  1. माजी आमदार श्री अमरभाऊ काळे यांनी श्री.हनुमान मंदिर देवस्थान हैबतपुर (वाठोडा) तीर्थक्षेत्र ला ‘क’ दर्जा मिळावा त्याकरिता वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुनिल जी केदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने दि.२२ ऑक्टोबर,२०२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.हैबतपुर नवीन पुनर्वसन मध्ये जुने गावठाण वाठोडा येथून श्री.हनुमान देवसस्थान ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याकरिता येथील प्रत्येक नागरिकांनी देणगी रुपात मदत करून व परिसरातील नागरकांनी सुद्धा मोलाची मदत करून भव्य दिव्य मंदिर उभारले. ह्या मंदिरात अनेक थोर संतांच्या मूर्ती स्थापना करण्यात आल्या.ह्या गावात आधीच हनुमान देवस्थान नावलौकिक असल्याने आजू-बाजूच्या परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येने असते.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होउ नये म्हणून विश्वस्त कमिटीने माजी आमदार श्री.अमरभाऊ काळे यांच्या कडे सदर मंदिराचा कायापालट व्हावा म्हणून भेट घेतली व चर्चा केली त्यानंतर श्री.अमरभाऊ काळे यांनी विश्वस्त मंडळाला प्रस्ताव तयार करण्याचे सांगून सदरचा प्रस्ताव शासन नियमाप्रमाणे सादर केला व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सुनिलजी केदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि हैबतपुर येथील देवसस्थानाला तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले व आता श्री.अमरभाऊ काळे यांच्या प्रयत्नांना यश आल्याने हैबतपुर येथील ग्रामवासीयांनी व परिसरातील नागरिकांनि श्री.अमरभाऊ काळे यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
Close
Close