शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी द्यावी…………. कपिल ठाकूर.

शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी द्यावी…………. कपिल ठाकूर.
आर्वी :- कोरोना मुळे मागील दोन वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा पूर्णपणे बंद होत्या त्याचे अतोनात नुकसान आमच्या सर्व खेळाडूंना झाले कारण शालेय क्रीडा स्पर्धा या विविध वयोगटांमध्ये होत असतात त्यामध्ये जन्मतारखेची व काही प्रमाणामध्ये वर्गाची सुद्धा आठ असते नक्कीच मागील वर्षांमध्ये 14 वर्ष वयोगट यामध्ये खेळणारा खेळाडू 17 किंवा 19 वर्षे वयोगटात मध्ये त्याला पुढे खेळावे लागते . मागील दोन वर्षापासून कोणत्याही शासकीय क्रीडा स्पर्धांना परवानगी नसल्यामुळे व शासकीय प्रशिक्षण शिबिराला ही परवानगी नसल्यामुळे पुढे चालून राज्यासाठी व देशासाठी खेळून जे खेळाडू नाव उंचावत असतात ते यापासून वंचित राहिले मी सुद्धा गेल्या सत्तावीस वर्षापासून व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर घेऊन विविध वयोगटातील खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे परंतु मागील दोन वर्षापासून मलाही प्रशिक्षण शिबिर घेता आले नाही अशी खंत आर्वीचे तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांनी व्यक्त केली. शाळा ही आता नियमित सुरू झालेल्या आहे त्यामुळे आता शालेय क्रीडा स्पर्धा नाही परवानगी द्यावी अशी मागणी संबंधित अधिकाऱ्याकडे कपिल ठाकूर यांनी व्यक्त केली