जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 585 कोटींच्या पिककर्जाचे वाटप 60 हजार शेतकऱ्यांनी घेतले पिककर्ज बॅंक ऑफ इंडियाचे सर्वाधिक कर्ज वाटप कर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सुचना

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 585 कोटींच्या पिककर्जाचे वाटप
60 हजार शेतकऱ्यांनी घेतले पिककर्ज
बॅंक ऑफ इंडियाचे सर्वाधिक कर्ज वाटप
कर्ज वाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सुचना
वर्धा, दि. १३ (जिमाका) : शेतकऱ्यांना खरीब आणि रब्बी पिके चांगल्या पध्दतीने घेता यावीत यासाठी पिककर्जाचे वाटप केले जाते. नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 584 कोटींच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तब्बल 60 हजार शेतकऱ्यांनी पिककर्जाचा लाभ घेतला आहे.
दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीस शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपाची प्रकीया सुरू केली जाते. पिककर्ज सहज उपलब्ध व्हावेत म्हणून नजिकच्या बॅंकांना शेतकऱ्यांना जोडून देण्यात आले आहे. बॅंकांना पिककर्ज वाटपाचे शाखानिहाय उद्दिष्ट दिले जाते. कर्ज वाटपाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून नियमीत आढावा घेतला जातो. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित राहून नये अशी भुमिका घेतल्याने नोव्हेंबर अखेर 60 हजार शेतकऱ्यांना 584 कोटींच्या खरीप व रब्बी पिककर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
पिककर्ज वाटप करणाऱ्यांमध्ये बॅंक इंडिया आघाडीवर आहे. या बॅंकेने जिल्ह्यातील 18 हजार 500 शेतकऱ्यांना 189 कोटींचे वाटप केले आहे. त्याखालोखाल भारतीय स्टेट बॅंकेने 16 हजार शेतकऱ्यांना 169 कोटींचे पिककर्ज वाटप केले आहे. ॲक्सीस बॅंकेने 102 शेतकऱ्यांना 2 कोटी 50 लाख, बॅक ऑफ बडोदा 1 हजार 700 शेतकऱ्यांना 22 कोटी, बॅंक ऑफ महाराष्ट्र 5 हजार 400 शेतकऱ्यांना 75 कोटी, कॅनरा बॅंक 1 हजार 400 शेतकऱ्यांना 14 कोटी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया 1 हजार 800 शेतकऱ्यांना 21 कोटी, इंडियन बॅंक 1 हजार 300 शेतकऱ्यांना 13 कोटी, एचडीएफसी बॅंक 800 शेतकऱ्यांना 17 कोटी, आयसीआयसीआय बॅंक 300 शेतकरी 4 कोटी, आयडीबीआय बॅंक 250 शेतकरी 1 कोटी 25 लाख, इंडियन ओव्हरसिज बॅंक 120 शेतकरी 1 कोटी 27 लाख, पंजाब नॅशनल बॅंक 1 हजार 600 शेतकरी 20 कोटी, युको बॅंक 140 शेतकरी 1 कोटी 73 लाख, युनियन बॅंक 1 हजार 240 शेतकरी 17 कोटी 53 लाख तर विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेने 1 हजार शेतकऱ्यांना 13 कोटी 51 लाखाचे पिककर्ज वाटप केले आहे.
रब्बीसाठी 82 कोटींच्या पिककर्जाची उचल
जिल्ह्यात रब्बी हंगामही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. जिल्ह्यातील 72 हजार शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी 82 कोटींच्या पिककर्जाची उचल केली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पिककर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे निर्देश संबंधित बॅंकांच्या प्रतिनिधींना दिले आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे. त्याप्रमाणे कृषि विभागाने नियोजन केले असून त्यासाठी पिककर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ते उपलब्ध करून दिले पाहिजे, असे निर्देशही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहे.