आर्वी / वर्धा जिला की ख़बर

शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन आदर्श शाळा निर्माण कराव्या -सरिता गाखरे

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211220-WA0000
photostudio_1641553606755
IMG-20220117-WA0083
IMG-20220116-WA0000

प्र.प.16 दि.5.1.2022
शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन आदर्श शाळा निर्माण कराव्या
-सरिता गाखरे

वर्धा, दि.5 (जिमाका) : जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता निर्माण करावी जेणे करुन आपल्या शाळेतील एकही विद्यार्थी इतर ठिकाणी प्रवेश घ्यायला जाणार नाही, त्यासाठी अथक परिश्रम घेऊन जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा आदर्श शाळा निर्माण कराव्यात, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व शिक्षण विभागाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान (ज्ञानोत्सव 2022 ) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला शिक्षण सभापती मृणाल माटे, शिक्षण समितीचे सदस्य त्रिलोकचंद कोहळे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवने, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण कु-हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवड करण्यात येणा-या राज्यातील 750 शाळामध्ये वर्धा जिल्हयातील जास्तीत जास्त शाळांची निवड होण्यासाठी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही सरिता गाखरे म्हणाल्या.
विज्ञान शाप की वरदान या बाबत मुख्याध्यापकांनी विचार करुन शाळांना मिळालेल्या साहित्याचा पुरेपुर उपयोग करुन आदर्श शाळा निर्माण कराव्यात, असे सत्यजित बडे यांनी सांगितले.
देवळी तालुक्यातील भिडी व गिरोली, आर्वी तालुक्यातील काचनूर व सालदरा या गावातील निवड झालेल्या आदर्श शाळांना आदर्श शाळा उपक्रमा अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षाणासाठी 3 लक्ष रुपये किमतीचे संगणक, लॅपटॉप, टॅब, प्रिंटर, ल्यामिनेटर, सांऊड सिस्टीम व डिजिटल शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण कु-हे यांनी व संचालन अरविंद भोसकर यांनी केले. कार्यक्रमाला आठही तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे तालुका समन्वयक निखिल किन्हेकर, सरपंच, शाळेचे मुख्याद्यापक, शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Close
Close