आर्वी / वर्धा जिला की ख़बर

वर्धा जिल्हयातील 30 गावातील सरपंचानी दिली मिर्झापुर नेरी ला भेट

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211220-WA0000
photostudio_1641553606755
IMG-20220117-WA0083
IMG-20220116-WA0000

वर्धा जिल्हयातील 30 गावातील सरपंचानी दिली मिर्झापुर नेरी ला भेट

*पंचायतराज अभ्यास दौरा मिर्झापुर (नेरी)*
आज दिनांक 07.01.2022 ला चेतना विकास गोपुरी, वर्धा येथिल पंचायतराज अभ्यास सहल वर्धा तसेच जिल्हातील प्रत्तेक तहसील मधील ग्रामपंचात सरपंच, उपसरपंच, सद्स्य मिर्झापुर नेरी यथे झालेले उत्कृष्ठ कामाची पाहणी करण्याकरीता व अभ्यासाकरीता आले.
सकाळी 11 वाजता येऊन त्यांचे ग्रामपंचायत आगमन झाले त्यावेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले , यावेळी श्रवण सोनट्टके नी मधुर स्वरात स्वागत गीत गावुन त्यांचे स्वागत केले त्यानंतर त्यांनी गावातील डिजिटल शाळेला भेट दिली तिथे त्यांचे स्वागत करून तेथील मुख्याध्यापिका महाजन व प्रफुल कांबळे सर यांनी माहिती देऊन पाहणी करण्यात आली तसेच डिजिटल अंगणवाडी , पाणी पुरवठा योजना व तीचे सौंदरीकरण, विहीर पुनर्भरण, परसबागा, पाणी संकलन, अलकाईन युक्त पाण्याचे ATM मशीन,सौर ऊर्जा प्रकल्प, गावातील सुंदर वाचनालय अभ्यासिका , इत्यादी झालेले कामे बघितली आणि त्यांच्या प्रश्नाचे निराकरण करून घेतले आणी गावातील कामे पाहुन सर्वानी गावाचा आदर्श घेऊन आम्ही पण असेच काम, उपक्रम आमच्या गावामध्ये राबवु असे सर्वांनी प्रतिक्रिया दिली आणि गावातील बचत गटाच्या महिलांसी संवाद साधून त्यांनी तयार केलेले वस्तूची पाहणी केली.
जातावेळी त्याच्यासाठी बचत गटातील महीलांनी नाश्ता आणि चहा देऊन सांगता केली.
यावेळी चेतना विकास गोपुरी, वर्धा येथील ज्योती वाटमोडे ( सुपरवायझर) , विमल पांडे ( सुपरवायझर), रंजना चौधरी, नलीनी जामुनकर, हे सर्व अभ्यास दौर्याला त्यांच्या सोबत उपस्थित होत्या
तसेच गावातील माजी उपसरपंच बाळाभाऊ सोनट्टके यांनी गावातील सुरवातीपासून चे झालेल्या विकास कामाची माहीती दिली आणी गावाने 6 बक्षिसे मिळविले त्यास कश्याप्रकारे प्रत्येकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सर्वांनी सहकार्य केले आणी चांगले कामे करण्यात यश आले, यावेळी गावचे माजी उपसरपंच , सचिव आर. शेंदरे, ग्राम सदस्य शामरावजी वाळके, ग्राम कर्मचारी शामरावजी अट्टेल, केअर इंडीया समन्वयक हर्षद मुंद्रे,प्रल्हादभाऊ ठाकरे,आणि गावातील बचत गटातील महीला उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
Close
Close