राज्य

मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय…दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक .

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय…

• छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता

• बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५०० चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या “निवासी” हा वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत

– मंत्री एकनाथ शिंदे
नगर विकास विभाग

——

• पायाभूत सुविधांची कामे वेगाने होण्यासाठी आता दिवसाप्रमाणे रात्री देखील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करण्यास मान्यता

• गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व मृतभाटकाच्या दरात सुधारणा

• मौजे आंबिवली येथील जमीन “शांताबाई केरकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टला” मॅटर्निटी होम व डिस्पेन्सरीसाठी भुईभाडयाने प्रदान करण्यास मान्यता.

– मंत्री बाळासाहेब थोरात
महसूल विभाग

——

• महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान ३% इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करून देणार

मंत्री यशोमती ठाकूर
महिला व बाल विकास विभाग

——

• कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणा-या स्कूल बसेसना वाहन करातून १००% सूट देण्याचा निर्णय
– मंत्री अनिल परब
परिवहन विभाग

—–

• दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
– मंत्री हसन मुश्रीफ
कामगार विभाग

—–

• साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई महामंडळाकडून राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ, दिल्ली यांची थकीत वसुली ८८.२४ कोटी रक्कम भरणा करण्यास मान्यता.
– मंत्री धंनजय मुंडे
सामाजिक न्याय विभाग

—–

• बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे मनोविकृती शास्त्र, बालरोग चिकित्सा शास्त्र तसेच स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ९ अध्यापकीय पदांची निर्मिती.
– मंत्री अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षण विभाग

Related Articles

Back to top button
Close
Close