आर्वीत जिजाऊ जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

आर्वीत जिजाऊ जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न*
दिनांक: १२ जानेवारी २०२२
*मराठा* सेवा संघ आर्वी तथा संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने स्थानिक स्वामी इन्क्लेव्ह येथे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड सुरेंद्रजी जाणे यांचे अध्यक्षतेत नुकताच राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्य *अभिवादन सोहळा* संपन्न झाला. जिजाऊ वंदनेने अभिवादन सोहळ्याची सुरवात झाली. प्रसंगी मा. शिवश्री प्रभाकर माळवे व मा. शिवश्री जाधव सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी जिजाऊंच्या जीवन कार्यावर माहिती देऊन कार्यक्रमाला संबोधित केले. प्रसंगी मराठा सेवा संघाचे वीरेंद्र कडू, प्रा. विजयराव चौधरी, प्रशांत ढवळे, विजयराव मारोडकर तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल क्षीरसागर, तालुकाध्यक्ष रोहण हिवाळे यांचेसह प्रामुख्याने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
*मराठा सेवा संघ आर्वी*