आर्वी / वर्धा जिला की ख़बर

जिल्हा वार्षीक योजनेचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घ्या -पालकमंत्री सुनील केदार , सन 2022-23 चा 187 कोटीचा आराखडा मंजूर,  यंत्रणांनी 100 टक्के निधी खर्च करावा,  पालकमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211220-WA0000
photostudio_1641553606755
IMG-20220117-WA0083
IMG-20220116-WA0000

जिल्हा वार्षीक योजनेचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घ्या
-पालकमंत्री सुनील केदार
 सन 2022-23 चा 187 कोटीचा आराखडा मंजूर
 यंत्रणांनी 100 टक्के निधी खर्च करावा
 पालकमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

वर्धा, दि.14 (जिमाका) : जिल्हा वार्षीक योजनेतून जिल्हयाच्या विकासाची कामे होत असतात. यंत्रणांकडून या योजनेतून मंजूर निधी वेळीच खर्च न केल्यास जिल्हयाचे नुकसान होते. त्यामुळे विभागांनी त्यांना मंजूर निधी तातडीने खर्च करावा. मंजूर निधी समर्पीत होणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी जिल्हा परीषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार रामदास आंबटकर, आ. रणजित काबंळे, आ.पंकज भोयर, दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सुरवातीस सन 2021-22 या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर केलेल्या खर्चाचा आढावा घेतला. या वर्षातील 34 कोटी 36 लक्ष रुपयांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता दिली. सन 2022-23 या वर्षासाठी यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार या पुढील वर्षासाठी कमाल आर्थिक मर्यादेनुसार 187 कोटी 74 लक्ष रुपयांच्या आराखडयास मंजूरी देण्यात आली. त्यात सर्वसाधारण योजनेचे 131 कोटी 67 लाख, अनुसुचित जाती उपयोजना 41 कोटी 42 लाख तर आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत 14 कोटी 14 लक्ष रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
जिल्हयाला पुर्वी 110 कोटीचा नियतव्यय मंजूर होता. त्यात 90 कोटीची वाढ करुन हा नियतव्यय 200 कोटी इतका केला. हा संपूर्ण निधी खर्च झाला पाहिजे. खर्च होत नसेल तर यंत्रणांनी आत्मपरीक्षण करावे. निधी खर्चासाठी कमी कालावधी असल्याने कमी कालावधीच्या निविदा प्रक्रिया राबवाव्या. वार्षिक योजनेतून आपण मोठया प्रमाणावर शाळा खोल्यांचे बांधकाम करतो. त्यांचा अहवाल गट विकास अधिका-यांकडे उपलब्ध असला पाहिजे. जिल्हयातील सर्व रस्त्यांचे उन्नतीकरण करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागास दिले. ग्राम सडक योजनेसाठी राज्यस्तरावर निधी प्राप्त करुन देऊ, असे ते म्हणाले.
गारपीटीचे पंचनामे तातडीने पुर्ण करा. एकही शेतकरी यातून सुटू नये. ग्राम पंचायतींना पाणी पुरवठा योजनांना नियमित वीज पुरवठा होण्यासाठी गावठाण फीडर करण्यात यावे. आष्टी येथील हुतात्मा स्मारकाच्या विकासासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून तातडीने या कामाचे आदेश करण्यात यावे. जिल्हयात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोजचे काम चांगले झाले आहे. दुस-या डोजचे काम वाढविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हयातील कृषि पंपाच्या जोडणीच्या विषयावर नागपूर येथे स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित आमदार व अन्य सदस्यांनीही मुद्दे मांडले. आ. रणजित काबंळे यांनी विभागांनी खर्चाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना केल्या. मंजूर कामे तातडीने झाले पाहीजे, असे त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना सुचविले. आ. पंकज भोयर यांनी आदिवासी उपयोजनेच्या नाविण्यपूर्ण निधीतून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व डिजीटल लायब्ररी सुरु करण्यासाठी निधी दयावा, असे सांगितले.
आ.दादाराव केचे यांनी पुरसंरक्षक भिंत, गावाला जोडणा-या पोच मार्गावर विद्युत पोल, जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडणारा रस्ता मंजूर व्हावा, असे विषय उपस्थित केले. आष्टी येथे हुतात्मा स्मारकासाठी 2 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल आ. रामदास आंबटकर यांनी पालकमंत्र्यांचे आभार मांडले. बैठकीचे प्रास्ताविक व आभार जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर यांनी केले.
00

Related Articles

Back to top button
Close
Close