अधिकाऱ्याकडे 14 कोटींची रोख रक्कम, दागिने आणि सात महागड्या सापडल्या आहेत. या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, जीप आणि मर्सिडीज यांचा समावेश

अधिकाऱ्याकडे 14 कोटींची रोख रक्कम, दागिने आणि सात महागड्या सापडल्या आहेत. या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, जीप आणि मर्सिडीज यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली – गुरुग्राममध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) अधिकाऱ्याकडे सापडलेल्या संपत्तीमुळे खळबळ उडाली आहे. आयपीएस अधिकारी असल्याचं भासवत लोकांची फसवणूक करून त्याने तब्बल 100 कोटींहून अधिकची मालमत्ता जमा केली होती. प्रवीण यादव असं या अधिकाऱ्याचं नाव असून पोलिसांनी आता या अधिकाऱ्याला अटक केली आहे. प्रवीण बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट होता. गुरुग्राम येथील मानेसरमधील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयात कार्यरत होता. या अधिकाऱ्याकडे 14 कोटींची रोख रक्कम, दागिने आणि सात महागड्या सापडल्या आहेत. या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, जीप आणि मर्सिडीज यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राम पोलिसांनी अधिकाऱ्यासोबत त्यांची पत्नी ममता यादव, बहिण रितू आणि सहकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत प्रवीण यादव यांने लोकांना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या परिसरात बांधकामाचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन देत कोट्यावधी रुपये घेतल्याचं आता समोर आली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व पैसे एनएसजीच्या नावे सुरू केलेल्या खोट्या खात्यात जमा केले होते. हे खातं त्याची बहिण रितू यादवने उघडलं होतं. रितू यादव एक्सिस बँकेत मॅनेजर आहे.
Source 17-01-2021