पंतप्रधान मोदीविरोधात बेताल वक्तव्य करणारे कांग्रेसनेते पटोलेंवर गुन्हे नोंद करण्याची मागणी..* *कारवाई न झाल्यास आ.समीर कुणावार यांनी दिला आन्दोलनाचा इशारा..

*पंतप्रधान मोदीविरोधात बेताल वक्तव्य करणारे कांग्रेसनेते पटोलेंवर गुन्हे नोंद करण्याची मागणी..*
*कारवाई न झाल्यास आ.समीर कुणावार यांनी दिला आन्दोलनाचा इशारा..*
हिंगणघाट दि.१८ जानेवारी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करीत त्यांचेविषयी अनुद्गार काढ़णारे कांग्रेसनेते नाना पटोले यांचा निषेध करीत आज दुपारी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार समिर कुणावार यांच्या नेतृत्वात हिंगणघाट पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविली.
यावेळी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपा शहर अध्यक्ष आशिष परबत, भाजपाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवकसुद्धा उपस्थित होते.
कांग्रेसनेते नाना पटोले यांनी महमहिम पंतप्रधानाबद्दल अनुचित उदगार काढले असून त्याचा वीडियोसुद्धा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
यात त्यांनी पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे,काही दिवसांपुर्वी राज्यात मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द बोलल्याच्या खोट्या वलग्ना करीत केंद्रीयमंत्री ना.राणेसह अनेक भाजपा नेत्यांवर राज्य सरकारने गुन्हेसुद्धा नोंदविले आहेत,काही दिवसांपुर्वी ना.राणे यांना राज्य सरकारचे ईशाऱ्यावरुन पोलिसांनी अनुचितपणे अटकसुद्धा केली आहे,परंतु यावेळी देशाचे नेते पंतप्रधान मोदी यांचेविषयी असे अपशब्द वापरल्याने कांग्रेसनेते नाना पटोले यांचेवर कारवाई झालीच पाहिजे,अशी मागणी आमदार समिर कुणावार यांनी यावेळी केली असून याप्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास भाजपाच्यावतीने आन्दोलनसुद्धा करण्यात येईल,असा इशारा आ.कुणावार यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांचे संदर्भात असे अपमानजनक उदगार काढल्यामुळे पोलिस तक्रार करतांना भाजपा कार्यकर्ते संतप्त झालेले दिसुन आले. याप्रसंगी आमदार कुणावार यांचेसह नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपा जिल्हा सचिव सुभाष कुंटेवार , भाजपा शहर अध्यक्ष आशिष परबत, भाजपा महामंत्री दिनेश वर्मा, शहर मंत्री अनिल गहेरवार ,महामंत्री अमोल राऊत, दीपक धामसे ,स्टार प्रचारक राकेश शर्मा ,अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान, वामन मावळे, पंकज देशपांडे, अमोल खंदार, कादर हुसेन , नरेश यूवनाथे, वैशाली पालांडे, रवी रोहणकर, विलास अंबरवेले, भास्कर शेंडे, अनिता मावळे, बबलू खेनवाल, ज्ञानेश्वर भागवते, छाया सातपुते, धनंजय उमप, नितीन माडेवार, रमेश टपाले, दत्ता जांभुळे, शारदा पटेल, प्रवीण वरटकर ,कौसर अंजुम मोहम्मद रफीक , कल्याणी गजानन ईटनकर, राजु नामदेव कामडी इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.