आर्वी / वर्धा जिला की ख़बर

राणे हॉस्पिटल इथे जन्मलेल्या प्रत्येक कन्येचे 250 रुपये भरून सुकन्या योजनेचे काढले बचत खाते…राणे हॉस्पिटल येथे मागील दहा वर्षात जन्मलेल्या कन्येचे खाते काढून देण्याचा केला संकल्प

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

*राणे हॉस्पिटल इथे जन्मलेल्या प्रत्येक कन्येचे 250 रुपये भरून सुकन्या योजनेचे काढले बचत खाते*

*डॉ. कालिंदी रिपल राणे यांनी राणे हॉस्पिटल येथे मागील दहा वर्षात जन्मलेल्या कन्येचे खाते काढून देण्याचा केला संकल्प*

आर्वी : 26 जानेवारीचे औचित्य साधून पोस्ट ऑफिस आर्वी व राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10 वाजता सुकन्या समृद्धी बचत खाते व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व तसेच राणे हॉस्पिटल येथे जन्मलेल्या प्रत्येक कन्याला या योजनेचा लाभ देण्याचे डॉ. कालिंदी राणे व डॉ. रिपल राणे यांनी ठरविले आहे. त्याचप्रमाणे विलास भोगे अधीक्षक डाकघर वर्धा, रुपेश बेले उपपोस्टमास्टर आर्वी,

राजेश डिके सब पोस्ट मास्टर नाचणगाव, राजेंद्र फुलझेले उपपोस्टमास्टर कारंजा,
मयूर इंगोले अदीदर्शक आर्वी,
रामकृष्ण महले शाखा डाकपाल जळगाव, सोपान भालतडक शाखा डाकपाल टाकरखेडा, सुधाकर जवादे, सागर माहोरे, देवेंद्र आंबुलकर पोस्टमॅन आर्वी,
यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राणे हॉस्पिटल सुकन्या समृद्धी कार्डचे वाटप यशस्वी यशस्वीपणे श्री निलेश देऊळकर यांची 1 दिवसाची कन्या ईच्यासह 21 लाभार्थ्यांना rane हॉस्पिटल कढून खाते काढून देण्यात आले आहे.
व यावेळी डॉ. कालिंदी, रिपल राणे यांनी राणे हॉस्पिटल येथे मागील दहा वर्षाच्या पर्यंत जन्मलेल्या कन्येचे खाते काढून देण्याचा संकल्प केला आहे.
तसेच या कार्यक्रमात पोस्टमास्टर रुपेश बेले व अधीक्षक विलास भोगे यांनी सुकन्या योजनेचे लाभार्थ्यांना महत्वही पटवून सांगितले .
याप्रसंगी प्रास्ताविक डॉ. रिपल राणे तर चव्हाण सर यांनी आभार प्रदर्शन केले होते.
तसेच राणे हॉस्पिटल येथे मागील दहा वर्षात जन्मलेल्या कन्या असेल त्यांच्या पालकांनी राणे हॉस्पिटल येथे संपर्क करून या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. रिपल राणे यांनी केले.

Related Articles

Back to top button
Close
Close