आर्वी – तळेगाव रस्त्यासाठी खासदारांच्या घरासमोर आंदोलन* (बाळा जगताप यांच्या नेतृत्वात प्रहारचा ठिय्या)

आर्वी – तळेगाव रस्त्यासाठी खासदारांच्या घरासमोर आंदोलन*
(बाळा जगताप यांच्या नेतृत्वात प्रहारचा ठिय्या)
आर्वी :- गेल्या तीन चार वर्षापासून आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम थंड बस्त्यात आहे ते प्रगतीपथावर येऊन पूर्ण व्हावे याकरिता प्रहार बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सातत्याने लढा लढत आहे. मात्र निष्ठुर प्रशासन व निद्रीस्त लोकप्रतिनिधी अजूनही धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर निघायला तयार नाही. त्यामुळे आज बाळा जगताप यांच्या नेतृत्वात चक्क वर्धा लोकसभेचे खासदार रामदास जी तडस यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहार ने ठिय्या आंदोलन आरंभले आहे. याच रस्त्यासाठी बाळा जगताप यांनी आंदोलन सप्ताहाचे सुद्धा आयोजन केले होते. त्यात रस्ता रोको, ऑपरेशन ब्लॅक आऊट, सहित लोकप्रिनिधींना प्रतीकात्मक श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली. मात्र तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे आज सरळ खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. ताबडतोब काम मार्गी लागेपर्यंत. आंदोलन सुरू राहील हा प्रश्न आता तडीस लावल्याशिवाय माघार नाहीच अशी भूमिका बाळा जगताप यांनी घेतली.