श्री क्षेत्र टाकरखेडा येथे इंडियन रेडक्रॉस तर्फे सर्व रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

*श्री क्षेत्र टाकरखेडा येथे इंडियन रेडक्रॉस तर्फे सर्व रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न*
इंडियन रेड क्रॉस शाखा आर्वी तर्फे श्री संत लहानुजी महाराज देवस्थान टाकरखेडा येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. आजूबाजूच्या गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करता अलोट गर्दी या शिबिराला लाभली आरोग्य शिबिरामध्ये जवळपास ५५० रुग्णांची तपासणी करून त्यांना ५०,००० रु. च्या औषधींचे वाटप करण्यात आले. यादरम्यान स्थानिक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आर्वी तर्फे त्या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीर आणि शिबिरार्थींनी देखील त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
औषधी विभाग,जनरल फिजीशियन,बालरोगतज्ञ,स्रिरोगतज्ञ,हृदयरोगतज्ञ,आयुर्वेदतज्ञ, होमीयोपॅथी,तज्ञ बीपी व शुगर तपासणी,शल्यकर्म(सर्जन), दंतरोगतज्ञ,अस्थिरोगतज्ञ,नेत्ररोगतज्ञ आदी डॉक्टर उपस्थित होते. संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा अध्यक्ष मा बाळासाहेब पावडे, आर्वी रेडक्रॉस चे डॉ.अरुण पावडे प्रसिद्ध शल्यविशारद डॉ.अविनाश लव्हाळे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी चे प्राचार्य डॉ.हरिभाऊ वेरुळकर यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात केली.या शिबिरासाठी आर्वी येथील तसेच वर्धा येथील सुप्रसिद्ध व तज्ञ डॉक्टरांची चमू श्री शेत्र टाकरखेडा येथे दाखल झाली होती. यात प्रामुख्याने प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अरुण पावडे,प्रसिद्ध शल्यविशारद डॉ.अविनाश लव्हाळे,डॉ.राजेश सरोदे,डॉ.प्रदीप सूने,डॉ.प्रशांत वादिभस्मे,डॉ.सचिन पावडे,डॉ.अभिलाष धरमठोक,डॉ.हर्षल पावडे, डॉ.शैलेश नागपुरे, डॉ.भूषण अग्रवाल,डॉ.आदिश सोनी,डॉ.उज्वल देवकाते,डॉ.सायरे,डॉ.भूषण होले,डॉ.नंदकिशोर कोल्हे,डॉ.सुभाष बुधवानी,डॉ.दिवाकर ठोंबरे,डॉ.प्रकाश धांदे, डॉ.श्यामसुंदर भुतडा,डॉ.अनिता भूतडा,डॉ.हर्षाली धरमठोक, डॉ.उमेश गुल्हाने,डॉ.कविता गुल्हाने,डॉ.प्रतिभा पावडे,डॉ.स्मिता पावडे,डॉ.अनिता ठाकरे इत्यादी डॉक्टर त्या ठिकाणी रोग निदान करण्याकरता उपस्थित होते या शिबिरामध्ये आजूबाजूच्या गावातील जवळपास ५५० रुग्णांनी लाभ घेतला सर्व रुग्णांना चिकित्सेने नंतर जवळपास ५०,००० रु. ची मोफत दवाई देण्यात आली.
या शिबिरात करिता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री.पांडे,प्रा.खोब्रागडे आदी प्राध्यापक सोबतच इंडियन रेडक्रॉस शाखा आर्वीचे सर्व सन्मानित सदस्य,वैद्यकिय प्रतिनिधी, संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा येथील सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.