पाण्यासाठी आर्वीत अधिकाऱ्यांना प्रहार चा घेराव* (बाळा जगताप व अरसलान खान यांच्या नेतृत्वात आंदोलन

*पाण्यासाठी आर्वीत अधिकाऱ्यांना प्रहार चा घेराव*
(बाळा जगताप व अरसलान खान यांच्या नेतृत्वात आंदोलन)
आर्वी :- सद्या उन्हाळ्याचे दिवस चालू असताना आर्वी त मात्र मनमर्जी कारभारामुळे आर्वीकर जनतेचे पाण्याअभावी घसे कोरडे पडत आहे. पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे आज प्रहार चे नेते बाळा जगताप व प्रहार सोशल फोरम चे कार्याध्यक्ष अरसलान खान यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण चे सहाय्यक अभियंता श्री. डहाके यांना घेराव घालण्यात आला.
आर्वी शहराला ज्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे त्या प्रमाणात एक ते सव्वा लाख लिटर पाण्याची कमतरता आहे. साल २०१८ पासून आर्वी त नवीन अन्याच्या टाकीचे काम चालू आहे मात्र अजून पर्यंत ते पूर्णत्वास गेले नाही संबंधित ठेकेदार हा एका मोठ्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता व ठेकेदार असल्याने त्यावर प्रशासन कार्यवाही करण्यात धजवत नाही. जर ही पाण्याची टाकी योग्य वेळी पूर्ण झाली असती तर आज नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता. शहरात पाण्यासाठी नवीन पाईप लाईन चे काम झाल्याने पाण्याचा फ्लो सुद्धा मंदावला आहे. या सर्व समस्यांना घेऊन आज आर्वी मध्ये प्रहार ने संबंधित अधिकाऱ्यांना तब्बल एक तास घेराव घालत आंदोलन केले. यावेळी सहाय्यक अभियंता जीवन प्राधिकरण श्री डहाके यांनी आंदोलनदरम्यान जेथे ब्लोकेज आहे ते आजच दुरस्त करून उद्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करून देऊ व पर्यायी कामाकरीता वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करू असे आश्वासन दिले. त्याचवेळी बाळा जगताप यांनी गडर लाईन मुळे जे रस्ते खराब झाले त्याबद्दल उपविभागीय अधिकारी आर्वी यांच्याशी चर्चा केली असता येत्या आठ दिवसात यासंबंधी बैठक लाऊन समस्येचं निराकरण करू असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिले. आश्वासनाअंती आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी
अन्नू मेजर, महेबुब पठान, शाहरुख खान, शेख मज़हर,विक्रम भगत, वकील शेख, यूनुस अहमद, ऋषि थोरात, वज़हात खान, आकिब रज़ा, बट्टू भाई, बाबू खां, वसीम शेख, राहुल चिडले, ठोक व इतर गौरक्षण वार्ड खडाकपुरा वार्ड परिसरातील नागरिक व कार्यकर्ता उपस्थित होते।