आर्वी / वर्धा जिला की ख़बर

महान क्रांतीकारक व आंतरराष्ट्रीय कृषितज्ञ डॉ.पांडूरंग खानखोजे यांच्या कुटूंबियांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार

VIGYAPAN
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG-20221004-WA0332
IMG_20220927_150515_046
IMG-20221019-WA0027
IMG_20221016_174312_421
IMG_20221015_134301_759

महान क्रांतीकारक व आंतरराष्ट्रीय कृषितज्ञ डॉ.पांडूरंग खानखोजे
यांच्या कुटूंबियांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार

वर्धा, दि.21 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गतच मुळचे वर्धा येथील निवासी असलेले महान क्रांतीकारक व आंतरराष्ट्रीय कृषितज्ञ डॉ.पांडूरंग सदाशिव खानखोजे यांच्या कुटूंबियांचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याहस्ते चरख्याचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.ज्ञानदा फणसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, प्रविण कु-हे यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. पांडूरंग सदाशिव खानखोजे यांचे नातु सुनिल खानखोजे, त्यांच्या पत्नी ज्योती खानखोजे, प्रदिप खानखोजे व त्यांच्या पत्नी वैशाली खानखोजे यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हयात विविध शासकीय योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी अंत्योदय नावाचे वेगळे अभियान देखील राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य चळवळीच्या काळात क्रांती घडवून आणणाऱ्या क्रांतीकारचा गौरव व्हावा यासाठी डॉ. पांडूरंग सदाशिव खानखोजे यांच्या कुटूंबियांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. पांडूरंग खानखोजे यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढाईत मोठे योगदान राहिले असून त्यांच्या कार्याची महती जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल. त्यांनी केलेल्या कृषि विषयक संशोधनामुळे त्यांना मॅक्सीको अन्नदाता म्हणुन ओळखले जाते. त्यांचे हरीतक्रांतीचे जास्तीत जास्त कार्य मेक्सिको येथे झालेले आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणा जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी सांगितले.
0000000

Related Articles

Back to top button
Close
Close