महाराष्ट्रातील, वर्धा जिल्ह्यातील, आर्वी तालुक्यात असलेल्या, श्री क्षेत्र टाकरखेड येथे जाणार्या नांदपूर-टाकरखेड रस्त्याची जीव घेणारी दशा

‘महाराष्ट्रातील, वर्धा जिल्ह्यातील, आर्वी तालुक्यात असलेल्या, श्री क्षेत्र टाकरखेड येथे जाणार्या नांदपूर-टाकरखेड रस्त्याची जीव घेणारी दशा जशीच्या तशीच… शासनाला व लोकप्रतिनिधींना काहीच खंत नाही…आता परिसरातील नागरीकच बांधणार रस्ता लोकवर्गणीतून…भविष्यात होणार्या निवडणुकीत, मते मांगण्याकरिता परिसरातील गावांमध्ये लोकप्रतिनिधींनी कृपया येऊ नये, ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींना विनम्र आवाहन…
श्री क्षेत्र टाकरखेड येथे येणार्या-जाणार्या लोकांची नांदपूर- टाकरखेड रस्त्याने नेहमीच दरवळ सुरू असते. हजारों लोक या रस्त्याने दररोज प्रवास करतात. परंतु रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की, केव्हाही कुठलीही अप्रिय घटना घडू शकते. रस्त्याची ही जीव घेणारी दशा कित्येक वेळा प्रसार माध्यमांनी प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली. परंतु कुणालाही या रस्त्याच्या अवस्थेची खंत वाटली नाही व दखल घेतली नाही. त्यामुळे आता परिसरातील नागरीकच लोकवर्गणीतून नांदपूर-टाकरखेड रोड बांधणार आहे. तसेच भविष्यात होणार्या निवडणुकीत, मते मांगण्याकरिता परिसरातील गावांमध्ये लोकप्रतिनिधींनी कृपया येऊ नये, असे विनम्र आवाहन ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी केलेले आहे.
सरकार ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी शहरातील चांगले रोड उखडून त्या ठिकाणी सिमेंटचे रोड बांधत आहेत. पण ग्रामीण भागात मात्र गावापर्यंत सुरक्षित पोहचण्याकरीता एक सुरक्षित साधारण रोड देखील निर्माण करू शकत नाही. ही एक फार विचार करणारी बाब आहे.
फक्त ‘स्मार्ट सिटी’ झाल्याने संपूर्ण देश ‘स्मार्ट’ होणार नाही. त्याकरिता ‘स्मार्ट व्हिलेज’ होणे अतिशय महत्त्वाचे. व ‘स्मार्ट व्हिलेज’ होण्याकरिता गावांना जोडणारे रस्ते ‘स्मार्ट’ होणे अतिशय अतिशय महत्त्वाचे.
आपल्या सर्वांच्या माहिती करिता सादर,
जरा विचार करा…