आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात सातत्याने होत असलेल्या प्रसूतीबाबत खूप मोठा प्रश्न आर्वी विधानसभा क्षेत्रातील जनतेला पडला असून व संपूर्ण रुग्णालयात सर्व कामात हलगर्जीपणा होत असलेले दिसून आले असता युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे..

आर्वी युवक काँग्रेसचा दणका
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात सातत्याने होत असलेल्या प्रसूतीबाबत खूप मोठा प्रश्न आर्वी विधानसभा क्षेत्रातील जनतेला पडला असून व संपूर्ण रुग्णालयात सर्व कामात हलगर्जीपणा होत असलेले दिसून आले असता युवक काँग्रेसने आज वैधकीय अधिकारी श्री मोहन सुटे सर यांना येत्या 4-5 दिवसात प्रसूती करिता रहिवासी डॉक्टर व सर्व गोष्टीवर तात्काळ मार्गी लावण्याचे सांगितले,व येत्या 4-5 दिवसांत या गोष्टी जर झाल्या नाही तर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे,
व सदर बाबींचे निवेदन देण्यात आले असून ते त्वरित मार्गी लावण्यासाठी युवक काँग्रेस पाठपुरावा करून सर्व कामे मार्गी लावेल. त्यावेळी उपस्थित आर्वी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री विशाल साबळे, आर्वी शहर अध्यक्ष श्री सागर शिरपूरकर, माझी आरोग्य सभापती श्री रामू राठी,अक्षय राठोड, वजाहत खान (कार्याध्यक्ष युवक काँग्रेस,आर्वी शहर )बंटीभाऊ सुरवाडे, इरफान रझा, आकाश बानोकर, रितीक वडणारे, पंकज वडणारे, अक्षय बिजवे, धर्मेश शर्मा, हितेश मेन्द्रे,अमोल दहाट, विक्की लसूनते,देवेंद्र तळेकर,सागर डाफे, राहुल सोनवाल, प्रशांत खरकटे, अक्षय मुडे,गणेश काळे,आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते…