स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रिडा स्पर्धेला प्रारंभ

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रिडा स्पर्धेला प्रारंभ
वर्धा, दि.4 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार प्राप्त किशोर पोफळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज सायंकार, तुषार देवढे, क्रिडा अधिकारी संदिप खोब्रागडे, रवि काकडे यांची उपस्थिती होती. दि.6 ऑगस्ट पर्यंत आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील 34 शाळांमधील 14 व 17 वयोगटातील मुलांनी व 17 वयोगटातील मुलींनी सहभाग नोंदविला आहे. दि.3 ऑगस्ट रोजी झालेल्या ज्ञानदा विद्यालय सातेफळ विरुध्द सरस्वती विद्या मंदिर च्या सामन्यात सरस्वती विद्या मंदिरने विजय मिळविला. सुफा इंग्लीश मिडीयम स्कुल वर्धा विरुध्दच्या सामन्यात सुफा इंग्लीश मिडीयमने, न्यु इंग्लीश स्कुल वर्धा विरुध्द स्कुल ऑफ स्कॉलर्सच्या सामन्यात न्यु इंग्लीश स्कुलने, अग्रग्रामी स्कुल म्हसाळा विरुध्द सेंट जॉन स्कुल हिंगणघाटच्या सामन्यात अग्रग्रामी ने तर श्रृजन इंग्रजी मिडीअम स्कुल देवळी विरुध्द चन्नावार ई विद्यामंदिर मंदिरच्या सामन्यात चन्नावार ई विद्यामंदिरने विजय मिळविला, असे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0000