आर्वी / वर्धा जिला की ख़बर

अमृत महोत्सवानिमित्त आयोजित बाईक रॅलीला चांगला प्रतिसाद  खा. रामदास तडस यांच्याहस्ते रॅलीचा शुभारंभ  खासदार, जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा सहभाग  विविध सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग

VIGYAPAN
photostudio_1634614114400
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1651243523526

अमृत महोत्सवानिमित्त आयोजित बाईक रॅलीला चांगला प्रतिसाद
 खा. रामदास तडस यांच्याहस्ते रॅलीचा शुभारंभ
 खासदार, जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा सहभाग
 विविध सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग

वर्धा, दि. 10 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज महात्मा गांधी चौक येथून बाईक रॅलीचे आयेाजन करण्यात आले होते. या रॅलीत लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक तथा सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनर रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.
वेगवेगळया मार्गाने काढण्यात आलेल्या दोन रॅलीला खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तर तिस-या रॅलीमध्ये खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी असलेल्या रॅलीला माजी सैनिकांनी हिरवी झेंडी दाखवून केले शुभारंभ केले.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी अभ्युदय मेघे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत, तहसिलदार रमेश कोळपे आदी उपस्थित होते.
नागरिकांमध्ये देशप्रेम जागृत राहावं. देशाला मिळालेले स्वातंत्र्य एका दिवसात मिळालेले नाही. आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याचं महत्व कळावं यासाठी यासाठी संपूर्ण भारतभर स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या महोत्सवानिमित्ताने सर्व नागरिकांनी आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावून देशाच्या स्वातंत्र्याप्रती अभिमान बाळगावा, असे रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना खा.रामदास तडस म्हणाले.
चले जाव आंदोलनाची मुहुर्तमेढ महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथून रोवली. देशावर झालेला अन्याय यावर वाचा फोडण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला. या लढयाची प्रेरणा मिळावी यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव उपक्रम साजरा करीत आहे. महोत्सवात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना केले.
बाईक रॅलीतील बाईक व चारचाकी वाहनांना तिरंगा झेंडा लावून विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, खाजगी संस्था, जयहिंद संघटना, वैद्यकीय जनजागृती मंच, जनहीत मंच, रोटरी क्लब, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघटना, पत्रकार संघ, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विदर्भ साहित्य संघ, माजी पोलिस संघटना, माजी सैनिक संघटना, जिव्हाळा संघटना, आधारवड फाऊंडेशन, गुरुदेव सेवा मंडळ व विविध संघटना व सामान्य नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
वेगवेगळया मार्गाने निघाल्या तीन रॅली
महात्मा गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम व परत सेवाग्राम आश्रम ते महात्मा गांधी पुतळ्या पर्यंत, दुसरी रॅली महात्मा गांधी चौक ते बोरगाव मेघे, सावंगी मेघे ते परत महात्मा गांधी पर्यंत तर तिसरी रॅली महात्मा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक – बजाज चौक – शास्त्री चौक – बॅचलर रोड – आर्वी नाका- धुनीवाले चौक – आरती चौक – नगर पालिका मार्गे परत महात्मा गांधी चौक येथे समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये विशेष मान्यवर अधिकारी सहभागी झाले होते.


0000

Related Articles

Back to top button
Close
Close