आर्वी / वर्धा जिला की ख़बर

देव तारी त्याला कोण मारी !

VIGYAPAN
photostudio_1634614114400
photostudio_1633317682627
IMG-20211129-WA0031

देव तारी त्याला कोण मारी !

बुधवार दिनांक 24 फेब्रुवारी 2021 सायंकाळचे पाचच्या सुमारास तळेगावातील मौजा- काकडदरा वार्ड क्र. 5 मधिल शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील श्री जानराव गूळभेले यांचे राहते घर आगीत जळाले, आता त्यांच्याकडे अन्न ,वस्त्र , निवारा कसा शिल्लक राहील, हे वाऱ्यातून टिपून इंडीयन रेडक्रोस सोसाईटी, आर्वीचे पदाधिकारी स्वतः घटनास्थळी पोहचले आणि कपडे,धान्य,किराणा व स्वयंपाकाची भाडी ई. संसारउपयोगी साहित्याची तत्परतेने मदत केली,त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
आता अन्न-वस्त्र मिळाले उरला फक्त निवारा, तोही उभारण्यासाठी आमचे तळेगावभुषण ज्यांनी एका खेड्याला एका क्षेत्रात विश्वगुरू म्हणून 231 सार्वभौम देशात नाव नोंदविले, याच खेड्याला शामजीपंतचे, डेपोचे, चाकू-छरीवाले व जावयांचे तळेगाव म्हणून ओळखत होते, त्यांना दुर्घटनेची बातमी कळताच क्षणी स्वतः घटनास्थळाची पाहणी करुण स्वखर्चाने 200+ चौ.फु घराच्या बाधकामाची सुरुवात आज पासून करण्याच्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
महादानाची माहिती देण्यासाठी पत्रकारांना घटनास्थळी बोलावण्याचा कार्यक्रम नियोजित होता, परंतु त्यांनी स्वतःच्या कार्याची प्रसिद्धी नाकारली, हा विषय आमच्यासाठी चिंतनाचा ठरला, म्हणून आम्ही तळेगावभूशानांच्या आयुष्याच्या प्रवासातील काही क्षण पाहिले, त्यात अहंकार नाही तर संघर्ष, जिद्द व त्यागचं निघाले, संघर्ष एवढा कोणाच्याही डोळ्यातून पाणि पडेल, जिद्द केवढी जो IAS सोडून छंद जोपासते आणि त्यागही केवढा मेट्रोशिटी सोडून जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवते.
आणि आम्ही गिलासावर नाव कोरून लग्नात सप्रेमभेट देणारे,आणखी किती प्रेरणा घ्यावी ! म्हणून म्हणते देव तारी त्याला कोण मारी ! शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील श्री जानराव गूळभेले यांना पुन्हा अन्न,वस्त्र,निवारा देणारे देवरूप जन मिळाले.

27-02-2021

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close