आर्वी / वर्धा जिला की ख़बर

प्रहार सोशल फोरम तर्फे गांधी जयंती निमित्त ज्येष्ठ गांधी विचारक चंद्रकांत वानखेडे यांचे व्याख्यान*

VIGYAPAN
IMG-20211220-WA0000
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG-20221004-WA0332
IMG_20220927_150515_046
IMG-20221019-WA0027
IMG_20221016_174312_421
IMG_20221015_134301_759

*प्रहार सोशल फोरम तर्फे गांधी जयंती निमित्त ज्येष्ठ गांधी विचारक चंद्रकांत वानखेडे यांचे व्याख्यान*

आर्वी :- गांधी जयंती च्या शूभपर्वावर प्रहार सोशल फोरम तर्फे आर्वी येथील माहेश्वरी भवन येथे ज्येष्ठ पत्रकार गांधी विचारक तथा “गांधी का मरत नाही” या पुस्तकाचे लेखक श्री. चंद्रकांत जी वानखेडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम सायं. ०६.०० वाजता आयोजित केला आहे. ते “आजची राजकीय परिस्थिती व गांधी विचार” या विषयावरती आपले मत व्यक्त करतील.
आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमध्ये गांधीजींचे विचार किती दूरगामी व चिंतनीय आहे. हे समाजातील तरुणांना व समाजघटकांना कळावे या करताच या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. गांधी काल आज आणि उद्या कसे प्रभावशाली आहेत हे युवा पिढीला कळावे याकरिता या व्याख्यानमालेचे आयोजन प्रहार सोशल फोरम तर्फे करण्यात आले आहे.
या व्याख्यानंमालेचा सर्व समाजघटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष श्री बाळाभाऊ जगताप यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रहार सोशल फोरम चे कार्याध्यक्ष अरसलान खान, संघटक सुधीर जाचक, कोषाध्यक्ष सय्यद जुनेद, सचिव मनोहर उईके यांच्यासह शहर कार्यकारिणीतील शहराध्यक्ष राजेश आगरकर, कार्याध्यक्ष सचिन पवणकर, संघटक हरी कळसकर, सचिव विक्रम भगत, कारंजा तालुका प्रमुख विद्यार्थी फोरम रोहित घागरे, सोशल मीडिया संयोजक सागर चोपडे, राजू तेलखडे आष्टी तालुक्यातील निलेश ठाकरे, पिंटू राऊत, रामू बारंगे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मेहनत घेत आहे.

Related Articles

Back to top button
Close
Close