इंडियन रेडक्राॅस संस्थेकडून दिवाळी निमित्य मिष्ठान्न वाटप * इंडियन रेडक्राॅस सोसायटी शाखा, आर्वी च्या वतीने दिवाळी मिष्ठान्न वाटपाचा कार्यक्रम इंडियन रेडक्राॅस सोसायटी शाखा, आर्वी ने दत्तक घेतलेले गाव महादापूर येथे व आर्वी तालुक्यातील आदीवासी गाव लहादेवी येथे आयोजित करण्यात आला..

23/10/2022* इंडियन रेडक्राॅस संस्थेकडून दिवाळी निमित्य मिष्ठान्न वाटप *
इंडियन रेडक्राॅस सोसायटी शाखा, आर्वी च्या वतीने दिवाळी मिष्ठान्न वाटपाचा कार्यक्रम इंडियन रेडक्राॅस सोसायटी शाखा, आर्वी ने दत्तक घेतलेले गाव महादापूर येथे व आर्वी तालुक्यातील आदीवासी गाव लहादेवी येथे आयोजित करण्यात आला याप्रसंगी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अरुण पावडे यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटी नेहमी सामाजिक कार्यामध्ये तत्पर असते असे सांगितले नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीडितांना मदत असो रक्तदान आरोग्य शिबिर डेंगू व इतर आजारासंबंधी जनजागृती असो वृक्षारोपण तसेच हे गाव दत्तक घेतले असल्यामुळे विशेषत्वाने येथील संपूर्ण गावकऱ्यांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे सातत्याने निराकरण करून त्यावर विविध शिबिरे घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यात येईल असे आव्हान याप्रसंगी डॉअरुण पावडे यांनी केले यावेळी महादापूर येथे जवळपास ७५ मिष्टांन किट व लहादेवी येथे ६५ किटचे वाटप करण्यात आले. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा, आर्वी च्या सदस्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गावातील सर्व कुटुंबाना दिवाळी मिष्ठान्न किट वाटप केल्या. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ पोलीस पाटील अंगणवाडी सेविका कोरडे ताई इंडियन रेड क्रॉस शाखा आर्वी सदस्य श्री नवल किशोर सिंह दीक्षित डॉ.अभिलाष धरमठोक देवकिसन भाटी प्रेमसिंग राठोड डॉ.गुल्हाने डॉ.बुधवानी श्री मोहन चांडक डॉ रवींद्र सोनटक्के डॉ.सतीश ठाकरे प्रेमसिंग राठोड ,प्रवीण शिरपूरकर, अनिस चोरडिया, विजय चोरडिया, लाठी वाला, श्री काने श्रीअनिल भट यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दर्शन चांभारे यांनी केले तसेच या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व गावकऱ्यांचे आभार सुद्धा त्यांनी मानले.