पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रोजगार मेळाव्यात आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमवेत प्रातिनिधिक स्वरूपात उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती पत्रे प्रदान केली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकार 75,000 रोजगार देत आहे, त्याचा शुभारंभ!

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रोजगार मेळाव्यात आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमवेत प्रातिनिधिक स्वरूपात उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती पत्रे प्रदान केली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकार 75,000 रोजगार देत आहे, त्याचा हा शुभारंभ!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
हा स्वप्नांच्या पूर्ततेचा प्रारंभ आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात 2000 नियुक्ती पत्रे देण्यात येत आहेत. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी 10 लाख रोजगाराचे लक्ष्य निश्चित केले आणि राज्यांना सुद्धा आवाहन केले. अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, याचा मला अभिमान आहे.
आता येणाऱ्या आठवडाभरात 18,500 पोलिस भरतीची जाहिरात,
महिनाभरात ग्रामविकास विभागाची 10,500 भरतीची जाहिरात,
इतरही विभागात अनेक पदे भरण्यात येतील. भरतीवरील अघोषित बंदी आता नाही.
विशेष म्हणजे या सर्व भरतीसाठी पारदर्शक काम व्हावे, भरतीत घोटाळे होऊ नये म्हणून भारतभर मान्यता असलेल्या संस्था निवडण्यात आल्या आहेत. भरतीची ही प्रक्रिया न्यायालयातून खोळंबू नये, याचीही काळजी घेण्यात येईल.
गेल्या 2.5 वर्षात काय झाले, हे तुमच्यापुढे आहेच.
ही काही शेवटची भरती नाही, येणाऱ्या काळात आणखी रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
1 लाख रोजगार निर्माण होतील असे सामंजस्य करार.
इतरही प्रयत्नांना वेग देण्यात येत आहे. त्यामुळे काळजी करू नका. रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.