आर्वी / वर्धा जिला की ख़बर
संविधान दिनानिमित्त एनसीसी छात्रसेनिकांची रॅली द्वारे जनजागृती

*संविधान दिनानिमित्त एनसीसी छात्रसेनिकांची रॅली द्वारे जनजागृती*
आर्वी :- स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयातील एकूण 82 छत्र सैनिकांनी तालुका विधि समिती यांच्या द्वारा आयोजित संविधान जनजागृती रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, मार्केट तिथून दिवाणी आणि फौजदारी न्यायालय येथे सांगता झाली गांधी चौक येथे सर्व छात्रसैनिकांना संविधानाचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले. विविध प्रकारचे घोषवाक्य देण्यात आले यामध्ये दिवानी आणि फौजदारी न्यायालय येथील कर्मचारी सहभागी झाले होते तसेच रॅलीचे नेतृत्व एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे आणि सिनियर कॅडेट्स यांनी केले. तसेच रॅली संपल्यानंतर बगीचा मध्ये असलेले अमर जवान या ठिकाणी 26/ 11 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना सलामी दिली।