शेतकऱ्यांकरीता प्रहारचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा…* (शेतकऱ्यांचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन)

*शेतकऱ्यांकरीता प्रहारचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा…*
(शेतकऱ्यांचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन)
आर्वी : तालुक्यातील मौजा सावळापुर येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाताना पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. सारंगपुरी तलावाच्या पलीकडे शेती असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यात नदीला पुर आल्यानंतर संपूर्ण रस्ता हा चिखलमय झालेला असतो. त्यामुळे शेतातून शेतमाल आणताना शेती साहित्य नेताना त्रास सहन करावा लागतो. गत काही कालावधी आधी याठिकाणी पाणी फाउंडेशन मार्फत काम करण्यात आले होते.तेव्हापासून हा रस्ता म्हणजे जणू काही शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरत आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकरी बांधव यांनी प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार आर्वी यांच्या मार्फत प्रशासनाला सदर नदीवर पूल व श्री. धुळे यांच्या शेतपासून तर श्री. देशमुख यांच्या शेतापर्यंत रस्ता डांबरीकरण करून देण्याची मागणी शासन व प्रशासनाला केली आहे. आम्ही दिलेल्या निवेदनावर सकारात्मक चर्चा करून मार्ग न निघाल्यास प्रहार बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी आंदोलनात्मक भूमिका घेऊ असा इशाराही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व प्रहार कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांच्यासह कार्याध्यक्ष अरसलान खान उपाध्यक्ष सुधीर जाचक यांच्यासह प्रहार कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते…