राज्य
समृद्धी महामार्गावर वाढली वर्दळ, सात दिवसांत 60 हजाराहून अधिक वाहनांनी केला प्रवास!

Maharashtra Samruddhi Mahamarg: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर ते शिर्डी या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरून 60 हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला असल्याची माहिती आहे.