राज्य

जिल्ह्यातील चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून दि. 31 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदरा येथे नववर्ष उत्सव साजरा करण्यासाठी येतात या पार्श्वभूमीवर नववर्षोत्सवानिमित्त चिखलदरा येथील वाहतूक मार्गात बदल

VIGYAPAN
photostudio_1633317682627
photostudio_1664351103597
IMG_20220927_150515_046
photostudio_1675928066038
photostudio_1675928029715

*नववर्षोत्सवानिमित्त चिखलदरा येथील वाहतूक मार्गात बदल*

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून दि. 31 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदरा येथे नववर्ष उत्सव साजरा करण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर दि. 31 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 दरम्यान परतवाडा ते चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाटवळणाचा असल्याने तेथे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक खोळंबण्याची व अपघात होण्याची शक्यता असते. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये या कालावधीत वाहतूकीचे नियमन योग्य प्रकारे करता यावे, यासाठी दि. 31 डिसेंबर 2022 ला सकाळी 8 वाजेपासून दि. 1 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत परतवाडा ते धामणगाव मार्गे चिखलदरा हा रस्ता जाण्यासाठी तसेच चिखलदरा, घटांग मार्गे परतवाडा हा रस्त येण्यासाठी या मार्गाची वाहतूक एकमार्गी करण्यात येत आहे.
या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, *असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत*.
*****

Related Articles

Back to top button
Close
Close