आर्वी / वर्धा जिला की ख़बर

राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आर्वीला शासनातर्फे मिळाली कोरोना लसीकरणाची परवानगी..* *वर्ध्या जिल्ह्यातील एकमेव खाजगी रुग्णालय म्हणून राणे हॉस्पिटलची कोरोना लसीकरणासाठी शासनाद्वारे निवड….* *सर्व जेष्ट नागरिकांनी घ्यावा या कोरोना लसीकरनाचा लाभ….डॉ रिपल राणे*

photostudio_1601020483281 (1)
VIGYAPAN
photostudio_1627621229111
photostudio_1627808634241
IMG-20210801-WA0159
photostudio_1630559959758

*राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आर्वीला शासनातर्फे मिळाली कोरोना लसीकरणाची परवानगी..*

*वर्ध्या जिल्ह्यातील एकमेव खाजगी रुग्णालय म्हणून राणे हॉस्पिटलची कोरोना लसीकरणासाठी शासनाद्वारे निवड….*

*सर्व जेष्ट नागरिकांनी घ्यावा या कोरोना लसीकरनाचा लाभ….डॉ रिपल राणे*

आर्वी तालुक्यातील रुग्ण सेवेमध्ये अव्वल असणाऱ्या राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आर्वी ला कोरोना लसीकरणाची परवानगी शासनाद्वारे देण्यात आली आहे.
शासनातर्फे सुरु केलेल्या कोरोना लसीकरणाची परवानगी आता महाराष्ट्रातील काहीच खाजगी रुग्णालयाना मिळाली आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे ग्रामीण स्तरावर नेहमीच उच्च दर्जाच्या रुग्ण सेवा प्रदान करणाऱ्या आर्वी येथील राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आर्वीला हा मान मिळाला आहे, याशिवाय वर्धेतील इतर दोन मोठ्या रुग्णालया सोबत राणे हॉस्पिटल हे जिल्ह्यातील एकमेव खाजगी लसीकरण केंद्र म्हणून शासनाने निवड केली आहे.
सर्व नागरिकांनी लसीकरणासाच्या नोंदणीसाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या नावाची नोंदणी स्वतःच करावयाची आहे. त्यानुसार शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आर्वी चे संचालक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॅा.रीपल राणे व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॅा.कालिंदी राणे यांच्या मार्गदर्शनात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरीकांनसोबतच वयवर्ष ४५ च्या वर असणाऱ्या मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सारख्या आजाराचे रुग्णांसाठी ही मोहीम असणार आहे.
लसीकरणाचा सर्व जेष्ठ नागरीकांनी लाभ घ्यावा व आपले कोरोना या भयंकर आजारापासून आपले स्वरक्षन करून घ्यावे असे आवाहन डॅा.रीपल राणे यांनी केले आहे.
राणे मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आर्वीला हा सन्मान मिळाल्याने सर्वसामान्य नागरीकांना लस मिळणार असल्याने परीसरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Back to top button
Close
Close