संभाजी ब्रिगेड (महिला आघाडी) व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला ,सामुहिक हळदी कुंकू सोहळा

*संभाजी ब्रिगेड (महिला आघाडी)* व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला *सामुहिक हळदी कुंकू सोहळा*
जिजाऊ-सावित्री जन्मोत्सव व संक्रांतिच्या औचित्याने आयनोक्स हॉल, साईनगर येथे *सामूहिक हळदी कुंकू सोहळा* आयोजित केला गेला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून *NCP नीता सनके मॅडम* व *सविता ताई बोंदरे* तसेच अध्यक्ष म्हणून *संगीताताई कडू* व प्रमुख मार्गदर्शिका *संगीता ताई वाघमारे* तसेच *ऍड.अल्काताई काळे* व *जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा शुभांगीताई डंभारे* उपस्थित होत्या.
हजारो वर्षांपासून स्त्रियांवर लादलेली बंधने झुगारून ज्यांनी स्त्रियांच्या अस्तित्वासाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी प्रचंड संघर्ष केला आणि स्त्री मुक्तीच्या नवं युगाचा प्रारंभ झाला अशा *जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई* या महानायिकांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक *संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष छायाताई बावणे* व संचालन *युवती आघाडी प्रमुख वैष्णवी जगताप* यांनी केलं. यामध्ये जिजाऊ सावित्री दशरात्रोसव साजरा करण्याची गरज का आहे हे त्यांनी पटवून सांगत महानायिकांच्या इतिहासातूनच आपल्याला नवी दिशा मिळते असे प्रतिपादन केले.
वाघमारे ताई यांनी जिजाऊ-सावित्री समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे हे पटवून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कडू ताई यांनी आज समाजाला सत्यवाणाच्या सावित्रीची नाही तर ज्योतिबाच्या सावित्री ची गरज आहे हे पटवून दिले.
मान्यवरांचे स्वागत *अर्चना ताई चाफले* यांनी केले व कार्यक्रमात सर्व उपस्थित झालेल्या महिलांचे आभार *सुनिता ताई जाने* यांनी के यांनी मानले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिलांना पुस्तके व तिळगूळ वाटत हळदी कुंकू सोहळा साजरा केला गेला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *छाया बावणे*, *वैष्णवी जगताप*,*प्रिया हेडाऊ*, *एकता जगताप*, *ज्योती जाधव*, *ज्योति परतेकी*, आदींचे सहकार्य लाभले.