स्थानिक नगर परिषद माध्य.व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,आर्वी येथे मा.उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या अंतर्गत *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये निबंधाचे विषय ‘मी माझे मत विकणार नाही.’एका बोटावरच्या शाईची किंमत’ हे होते.यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये शाळेतून *पहिला क्रमांक* १) कु.वैभवी बारापात्रे वर्ग ९ वा

आर्वी- स्थानिक नगर परिषद माध्य.व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,आर्वी येथे मा.उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या अंतर्गत *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये निबंधाचे विषय ‘मी माझे मत विकणार नाही.’एका बोटावरच्या शाईची किंमत’ हे होते.यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये शाळेतून
*पहिला क्रमांक*
१) कु.वैभवी बारापात्रे वर्ग ९ वा
*दुसरा क्रमांक*
२)सुजल चव्हाण वर्ग ८ वा
*तिसरा क्रमांक*
३) कु.संचिता डोंगरे वर्ग ९ वा
यांचा आलेला असून त्यांना आज दि.२५/१/२०२३ बुधवार रोजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,आर्वी येथे असलेल्या *राष्ट्रीय मतदार दिन* कार्यक्रमामध्ये मा.सौ.स्मिता माने मॅडम (नायब तहसीलदार) तहसिल कार्यालय,आर्वी आणि इतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.आपल्यातील कलागुणांना सादर करण्याचे एक मात्र साधन म्हणजे स्पर्धा होय. असे म्हणत शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती उषाताई नागपुरे यांनी कौतुक केले. तसेच शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यार्थ्याचा आत्मविश्वास द्विगुणित केला. शाळेतील या सर्व स्पर्धेकरिता हेमराज चौधरी सर व सचिन मुन सर यांनी सहकार्य केले.